• 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
  • पंढरपूर Live 7 october  2017 



    विरपुत्र मुन्नागिर गोसावी, शिवाजीराव शिंदे, मंगल शहा यांना सामाजिक गौरव पुरस्कार
    । पंढरपूर, प्रतिनिधी
     क्रांतीसिंह नाना पाटील तरूण मंडळ व संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. माझ्या माहितीनुसार स्वत:चा एवढा मोठा खर्चकरून अनेक स्पर्धा नवरात्रोत्सवात दोन वेळा मोफत फराळ, अनेक स्पर्धकांना मोठ मोठी बक्षिसे कोणतीही वर्गणी अथवा देणगी न घेता नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करणारे कोणतेही मंडळ नाही. नेहतराव बंधुचे खरेच कौतुक करावे असे उद्गार जेष्ठ साहित्यीक डॉ.  द.ता.भोसले यांनी काढले. नवरात्रोत्सवा निमित्त या वर्षा पासून क्रांतीसिंह नाना पाटील तरूण मंडळ व संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळ यांनी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या व्यक्तिसाठी व सामाजिक संघटनासाठी विविध पुरस्काराचे आयोजन केले होते. 
    या कार्यक्रमात डॉ. द.ता. भोसले सर बोलत होते. सदर कार्यक्रमात शहिद मेजर कुनाल गोसावी यांच्या विरपिता मुन्नागिर गोसावी यांना विरपिता पुरस्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या हमाल- मापाडी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे व एड्स ग्रस्त मुलासाठी काम करणार्‍या पालवीच्या मंगल शहा यांना सामाजिक गौरव पुरस्कार डॉ. द.ता.भोसले यांच्या हस्ते देवून गौर करण्यात आले. याच कार्यक्रमात पंढरपूर शहरात सामाजिक कार्य करणार्‍या सामाजिक संगटनांना ही पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 
    यावेळी मंडळाचे  अध्यक्ष वसंतराव नेहरतराव, माजी जि.प.अध्यक्षा सुमनताई नेहतराव, शाम नेहतराव, संतोष नेहतराव, अमोल नागटिळक, नगरसेवक सुरेश नेहतराव, निखिल नेहतराव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष नेहतराव यांनी केले तर आभार अमोल नागटिळक यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंंचालन प्रशात वाघमारे यांनी केले


    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे