!१४ व्या युवा महोत्सवात उमटली स्वेरीची मोहोर !

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13 October 2017

 



१४ व्या युवा महोत्सवात उमटली स्वेरीची मोहोर !

वादविवाद व समूहगीत स्पर्धेत मिळविले यश
पंढरपूर- सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे मंगळवेढा मधील श्री संत दामाजी महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या १४ व्या युवा महोत्सवात येथील श्री विठ्ठल एज्युकेन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटसंचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवत पुरस्काराच्या यादीत स्थान मिळविले.त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
           अभियांत्रिकीच्या प्रवेशापासून ते असलेला अभ्यासक्रम संपेपर्यंतचा कालावधी अपुरा पडतो. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रासाठी व त्याच्या तयारीसाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना फारसा वेळ मिळत नाही त्यातूनही स्पर्धेच्या युगात प्रवास करत असताना मंगळवेढ्यातील सोलापुर विद्यापीठाच्या१४ व्या युवा महोत्सवात देखील स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला. वादविवाद स्पर्धेत अभिनव आनंद व अरुणा गोवर्धन पुजारी यांनी तृतीय क्रमांक मिळविला तर समूहगायन स्पर्धेत देखील अस्मिता दिनकर कांबळे, श्वेता प्रभाकर घोडके, भक्ती संभाजी मडके, कोमल शहाजी चंदनशिवे, ऐश्वर्या विकास गुरव, सायली सुहास रणवरे, यांच्या सुमधुर गायनाला राम केराप्पा काळे यांनी हार्मोनियम तर शुभम किशोर परदेशी यांनी तबला वाजवून उत्कृष्ठ साथ दिल्यामुळे या  विद्यार्थ्यांच्या गायनाला तृतीय क्रमांक पारितोषक मिळाले. त्यामुळे स्वेरीच्या पंढरपूर पॅटर्नची मोहोर १४ व्या युवा महोत्सवाच्या निमित्ताने दामाजी नगरीत उमटवली. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.यशपाल खेडकर व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्यामुळे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या इतर तीनही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
छायाचित्र- सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे श्री संत दामाजी महाविद्यालयात पार पडलेल्या १४ व्या युवा महोत्सवात स्वेरीच्या विद्यार्थ्यांनीवाद विवाद व समूहगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविल्यामुळे त्यांचा संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे. सोबत बसलेले डावीकडून सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी,संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एन.व्ही.खडके. अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात व यशस्वी विद्यार्थी.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments