प्रधानमंञी आवास योजनेमुळे गंजगावच्या नागरिकांसाठी अच्छे दिन

पंढरपूर Live 26 October 2017
प्रधानमंञी आवास योजनेमुळे गंजगावच्या नागरिकांसाठी अच्छे दिन

 *बिलोली प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि तेंलगाणाच्या सिमेवर असलेल्या गंजगाव येथिल प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत सन 2016 -17 या वर्षात येथिल कार्यक्षम व जबाबदार सरपंच मुळे या गावात 136 घरकुल मंजुर झाली असुन हे गाव या योजनेचा लाभ घेण्यात बिलोली तालुक्यात पहील्या क्रमांकावर आहे. येथिल ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजावर येथिल जनता समाधानी असुन नरेंद्र मोदीच्या या योजनेमुळेही नागरिक अनंदीत आहेत .136 पैकी 104 लाभार्थाच्या बँक खातेवर थेट अनुदान प्राप्त झाले आहे. या गावातील अनेक नागरिक निवार्या पासुन वंचित होते. परंतु येथिल सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांनी या योजनेत जातीने लक्ष घालुन शासनाला वेळोवेळी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या गावात मोठ्या संख्येने घरकुल मंजुर झाले आहेत . येथिल जनता नरेंद्र मोदीच्या सब का साथ सबका विकास या घोषणेला साथ दिली होती. आणि आता त्यांना अच्छे दिन आल्यासारखे वाटत आहे. अनेकांचा निवार्याचा प्रश्न मिटल्यामुळे सर्व नागरिक भाजप सरकार वर  समाधानी आहेत. या योजनेच्या पाठपुराव्यात ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच सौ. साविञाबाई घाटेआणी ग्रामसेवक श्री. प्रकाश वाघमारे यांची भुमिका महत्त्वाची असुन या योजनेच्या लाभात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील योग्य समन्वयामुळे या घरकुल योजनेचा फायदा येथिल जनतेला झाला आहे.
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments