पंढरपूर Live 30 October 2017

कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..! 
विठ्ठल॥ विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥


वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूरच्या विकासास प्राधान्य
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
पंढरपूर दि. 30 :-  पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येणाऱ्या वारकरी-भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन  वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळांचा विकास करीत असल्याची माहिती महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
            कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापुजेसाठी महसूल मंत्री श्री. पाटील पंढरपूर येथे  आले असून त्यांनी यावेळी पंढरपूरातील विविध मठांना भेटी दिल्या त्या प्रसंगी मठातील महाराज, वारकरी,फडकरी यांच्या संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आमदार प्रशांत परिचार, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, शेखर चरेगावकर, श्रीकांत भारतीय, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, तहसिलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह मान्यर पदाधिकारी, अधिकारी व वारकरी-भाविक उपस्थित होते.
            महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढपुरातील मच्छिंद्र महाराज मठ, मारुती बुवा कराडकर मठ,  देहूकर महाराज मठ, तात्यासाहेब वासकर महाराज मठ, आप्पासाहेब वासकर महाराज मठ, यादव महाराज मठ यासह अन्य मठांना भेटी देवून मठातील महाराजांकडून वारी, वारकऱ्यांच्या समस्या याबाबत चर्चा केली. यावेळी महसूल मंत्री श्री. पाटील म्हणाले, मठ आणि परिसरात असणाऱ्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.  पंढरपुरातील स्वच्छता, चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता ही कामे प्राधान्याने केली जातील.
            यावेळी मठातील महाराज मंडळनी आपआपल्या समस्यां महसूल मंत्र्यांना सांगितल्या. या समस्यांचे निराकरण करण्यात प्राधान्य देण्यात येईल असे महसूल मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.



13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे