पंढरपूर Live 31 October 2017
कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..!
॥विठ्ठल॥ ॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥
॥विठ्ठल॥ ॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥
राज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे
पंढरपूर दि. 31 :- राज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे, असे साकडे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेच्या वेळी श्री विठ्ठल चरणी घातले.
पंढरपूर येथे कार्तिक एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापुजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. शासकीय महापुजेस महसूल मंत्री श्री. पाटील यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कर्नाटक राज्यातील विजापूर तालुक्यातील हडगल्ली येथील बळीराम शेवू चव्हाण (वय 40 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी शिनाबाई बळीराव चव्हाण (वय 35 वर्षे) या वारकरी दांपत्याला मिळाला.
शासकीय महापुजेनंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात महसूल मंत्री पाटील बोलत होते. समारंभास मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, श्रीकांत भारतीय उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील शासन हे सामान्य नागरिकांचे शासन आहे. सामान्य नागरीक, शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्या हिताला नेहमीच शासनाने प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना त्याच्या पायावर भक्कमपणे उभे करणे, त्याच्या जीवनात आर्थिक् स्थैर्य मिळवून देणे आणि त्यांच्या शेतीची उत्पादक क्षमता वाढविण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात असल्याचेही महसूलमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
महसूल मंत्री म्हणाले, पंढरपुरात वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येत असतो. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्याला जे समाधान मिळते त्याच प्रकारचे समाधान त्याला पंढरपूर येथील व्यवस्था, स्वच्छता पाहून मिळावे. यासाठी राज्य शासनाने निर्मलवारीच्या उपक्रमातून प्रयत्न सुरु केले आहेत. यातून चंद्रभागा नदी स्वच्छता, वाळवंट स्वच्छता, नमामी चंद्रभागा सारखे उपक्रम राबविले जात आहेत. पंढरपूरच्या मंदिर समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून महसूल मंत्री म्हणाले, भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, मंदिर व परिसरातील स्वच्छता विषयक काम, पंढरपूर शहरातील शौचालये या कामात घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असाच आहे.
पंढरपूर हे पवित्र शहर आहे. येथे येणाऱ्या भाविक भक्ताला चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी आणि शहर व वाळवंटात वीज उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. मंदिर समितीने सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढे यावे. देशातील, राज्यातील अन्य मंदिर समितीमार्फत जसे उपक्रम राबविले जातात तसेच उपक्रम पंढरपुरात राबविण्यास प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा महसूल मंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली. शासनाने पंढरपूरच्या मंदिर समितीमध्ये सह अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मंदिर समितीचे काम अधिक गतीने व चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या समारंभात मानाचे वारकरी दापंत्य श्री. व सौ. चव्हाण यांचा सत्कार तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत देण्यात येणारा मोफत एस.टी. पास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच मंदिर समितीमार्फत समितीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचे वितरण आणि वारकरी भाविकांसाठी समितीमार्फत नव्याने सुरु करण्यात आलेल्या दर्शन टोकन पासचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात मंदिर समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली.
समारंभास माजी मंत्री बबनराव पाचपुते, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, मंदिर समितीचे सदस्य औसेकर व श्रीमती नडगिरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व भाविक उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
पंढरपूर Live 31 October 2017
चिकुनगुन्या, डेंग्युपासून बचाव, हे फक्त तुमच्या सहकार्यानेच होऊ शकते..!
पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर
नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग
पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी आवाहन
*चिकुनगुन्या, डेंग्यु आजार न होण्यासाठी घ्यावयाची काळजी*
चिकुनगुन्या, डेंग्युचा प्रसार स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये तयार होणार्या ‘एडिस इजिप्टी‘ डासापासून होतो म्हणून..... खालील प्रमाणे नागरिकांनी काळजी घ्यावी..!
* घरामध्ये पाण्याचे साठे पाच दिवसापेक्षा जास्त दिवस करु नयेत. रोजच्या रोज भांडी स्वच्छ करुन, धुऊन भरावीत.
* घरामध्ये असणार्या फ्रीज, एअर कुलर, प्लॉवर पॉट्स, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, पत्र्याचे डबे, अथवा इतर वस्तु यामध्ये पाणी पाच दिवसापेक्षा जास्त काळ साठणार
नाही, याची काळजी घ्यावी. कारण यामध्ये चिकुन गुन्या, डेंग्युच्या डासांची पैदास होऊ शकते.
* घराबाहेरील परिसरात असणार्या रिकामे शहाळे, फुटक्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या कुंड्या, रिकामे डबे, निकामी वाहनांचे टायर्स, खड्डे, इ. मध्ये
पावसाचे पाणी साठून त्यामध्ये चिकुनगुन्या, डेंग्युच्या डासांची पैदास होऊ शकते. यासाठी या वस्तुंची विल्हेवाट लावा. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा.
* गच्चीवर असणार्या अथवा जमीनीवर असणार्या पाण्याच्या टाक्यांची झाकणे गच्च लावा. त्यामध्ये अजिबात फट ठेवू नका. अन्यथा त्यामध्ये डास जावून डासोत्पत्ती होईल.
* पाणी साठवण्याचे ड्रम, बॅरल इत्यादी दर दोन-तीन दिवसांनी धुवून स्वच्छ व कोरडे करावेत.
* पाणी साठवण्याचे मोठे साठे, टाक्या असल्यास त्याची तपासणी आरोग्य कर्मचार्याद्वारे करुन घ्यावी.
* लक्षात ठेवा डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण न केल्यास डास निर्माण होणार नाहीत व त्यामुळे चिकुनगुन्या, डेंग्यु, मलेरिया आजार होणार नाहीत.
* सेप्टी टँकच्या व्हेट पाईपला वरच्या बाजुला नायलॉन जाळे बसवून घेणे.
* रोज रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर जरुर करावा.
वरील प्रमाणे सर्व सुचनांचे पालन करुन दक्षता घेतल्यास चिकुनगुन्या, डेंग्यु तापाचा प्रसार आपल्या शहरामध्ये होणार नाही.
नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन सौ.साधना नागेश भोसले (नगराध्यक्षा, नगरपरिषद पंढरपूर), श्री.अभिजीत बापट (मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूर), सौ. सुजाता त्रिंबक बडवे (उपनगराध्यक्षा, नगरपरिषद पंढरपूर), सौ. शिंदे भाग्यश्री देवेंद्र (सभापती, आरोग्य विभाग नगरपरिषद पंढरपूर), डॉ. श्री. एस. बी. गायकवाड (आरोग्य अधिकारी, नगरपरिषद पंढरपूर) व श्री. डी. एफ. गजाकोश (प्रभारी जीवशास्त्रज्ञ,ना.हिवताप योजना न.प.पंढरपूर ) यांनी केले आहे.
- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





0 Comments