धमकीची नको, बलात्कार झाल्यावर तक्रार दे :नागपूर पोलीसांचा प्रताप


धमकीची नको, बलात्कार झाल्यावर तक्रार दे :नागपूर पोलीसांचा प्रताप

पंढरपूर Live 16 NOVEMBER 2017
नागपूर: केवळ बलात्काराची धमकी दिल्यानंतर नाही तर गुंडाने बलात्कार केल्यानंतर तक्रार करायला या, असं धक्कादायक उत्तर नागपूर पोलिसांनी दिलं.
नागपूरच्या अमिता जयस्वाल या तरुणीनं काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तिला गुंडांकडून धमक्या यायाला सुरुवात झाली आहे. याविरोधात ती पोलिसात गेली. त्यावेळी तिला पोलिसांनी हे धक्कादायक उत्तर दिलं.
सक्करदरा परिसरात राहणाऱ्या अमिता जयस्वालनं तिच्या परिसरातील एका अतिक्रमणाची तक्रार महापालिकेकडं केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर महापालिकेने ते अतिक्रमण काढले. मात्र यानंतर अमिता जयस्वाल आणि तिच्या कुटुंबियांना परिसरातील काही गावगुंडांनी जगणं मुश्कील करुन टाकलं आहे.सध्या जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर रात्री-अपरात्री दगडफेक केली जातेय.हे गुंड मनात येईल तेव्हा जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर हल्ला करतात, बलात्काराची धमकी देतात. नागपूर पोलीस मात्र गुन्हा घडण्याची वाट पाहात मौन धारण करुन आहेत.हे गुंड जयस्वाल कुटुंबियांच्या खासकरून अमिताच्या मागे लागले आहेत. येता- जाता अश्लिल शिव्या देणे, चाकू – इतर हत्यारे दाखवून धमकावणे, रात्री अंधारात घरावर दगड फेकणे, घराच्या दारावर लाथा मारणे असे प्रकार अमिता सहन करत असतानाच, काल रात्री घरावर चालून आलेल्या 15 ते 20 लोकांच्या जमावाने अमिताला बलात्काराची  धमकी दिली.धक्कादायक बाब म्हणजे घाबरलेल्या अमिताने त्वरित सक्करदरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र, गुन्हा घडेल फक्त या आधारावर तक्रार घेता येत नाही, गुन्हा घडल्यावर तक्रार दे, असे सांगून पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तिची तक्रार घेणे तर दूर, तक्रारीची पोच पावती देण्यासही नकार दिला.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments