पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पंढरपूर यांच्या वतीने कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'विंदायन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात रजनीश जोशी, विद्या लिमये,गुरुराज जोशी,व शंतनू कोर्टीकर हे कलाकार विंदांच्या काही आठवणी त्यांच्या कविता रसिकांसमोर गायन स्वरूपात व वाचन स्वरूपात सादर करीत संपूर्ण विंदांचा जीवनपट आपल्यासमोर उभा करणार आहेत..
सदर कार्यक्रम २८ नोव्हेंबर वार मंगळवार रोजी सायंकाळी ५.०० वाजता कवठेकर प्रशाला, नाथ चौक पंढरपूर येथे संपन्न होणार असल्याची माहिती मसाप चे प्रमुख कार्यवाह कल्याणराव शिंदे यांनी दिली आहे.या कार्यक्रमाचे प्रायोजक पंढरपुरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा हे आहेत.कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जेष्ठ ग्रामिण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले, व मसाप पंढरपूर शाखेचे अध्यक्ष नानासाहेब रत्नपारखी यांनी केले आहे..

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





0 Comments