दुबईचे मसाला किंग धनंजय दातार यांचे मसापकडून विमानतळावर स्वागत आज नवउद्योजकांसाठी उद्योग प्रेरणा

दुबईचे मसाला किंग धनंजय दातार यांचे मसापकडून विमानतळावर स्वागत 
आज नवउद्योजकांसाठी उद्योग प्रेरणा 

दुबईतील मसाला किंग धनंजय दातार यांचे सपत्नीक सोलापूर विमानतळावर आगमन झाले त्यावेळी त्यांचे स्वागत करताना मसाप दक्षिणचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, महाराष्ट्र शिखर बॅकेचे संचालक अविनाश महागांवकर आदी.                छाया- नागेश दंतकाळे

पंढरपूर Live 11 NOVEMBER 2017
सोलापूर, (प्रतिनिधी):-  महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने सोलापूरातील नवउद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उद्योग प्रेरणा या कार्यक्रमासाठी दुबईचे मसाला किंग धनंजय दातार यांचे शनिवारी दुपारी विमानाने सोलापूरात आगमन झाले त्यावेळी मसापच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. आज सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात आयोजित उद्योग प्रेरणा कार्यक्रमासाठी त्यांचे सोलापूरात आगमन झाले
सोलापूरातील नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी या हेतुने आणि मराठीचा झेंडा सातासमुद्रापार यशस्वीपणे फडकवणारे दुबईतील सुप्रसिध्द मसाला किंग धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमासाठी धनंजय दातार यांचे शनिवारी सोलापूरात विमानाने आगमन झाले. मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणी वरील सुप्रसिध्द निवेदिका उत्तरा मोने ह्या धनंजय दातार यांची मुलाखत घेणार आहेत. दुबई येथील विमानतळावरून मुंबई आणि मुंबई विमानतळावरून थेट सोलापूर विमानतळावर धनंजय दातार यांचे सपत्नीक आगमन झाले. त्यावेळी मसाप दक्षिणचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, महाराष्ट्र शिखर बॅकेचे संचालक अविनाश महागांवकर यांनी पुष्पगुच्छ देवून दातार पती पत्नीचे स्वागत केले. अत्यंत उत्साहात धनंजय दातार यांनी सोलापूरच्या विमानतळावर पदार्पण केले. उपस्थितांकडून त्यांनी सोलापूरबद्दलची माहिती घेतली. दुबई मध्ये अलअदील ए्नसपोर्ट ट्रेडर्स या त्यांच्या मसाला व्यवसायाबद्दलही माहिती दिली आणि कशापध्दतीने त्यांनी यश संपादन केले याबाबत थोड्नयात चर्चा केली. सविस्तर मुलाखतीच्या कार्यक्रमात सांगू असेही ते म्हणाले. महाराष्ट्र साहित्य परिषदे दक्षिण सोलापूर शाखेच्या या उपक्रमाबाबत त्यांनी कौतुक केले. सोलापूरच्या विकासाबाबत साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही उपक्रम राबविले जातात याची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर शाखेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी सोलापूरातील सर्व नवउद्योजक तरूण तरूणींनी रविवार दि. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेल्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहातील उद्योग प्रेरणा या कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. सोलापूरसाठी ही पर्वणी असून त्याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे असेही यावेळी सांगण्यात आले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments