भाजपच्या मंत्र्यांसह आमदार खासदारांची दाढी कटिंग करणार नाही... नाभिक संघटनांचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहीत छायाचित्र)
पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंडमधील कार्यक्रमात नाभिक समाजाविषयी केलेल्या विधानावरुन वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांची कटिंग आणि दाढी करायची नाही, असा निर्णय यवतमाळमधील नाभिक संघटनेने घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी दौंडमधील पाटस येथे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काँग्रेसवर निशाणा साधताना मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे विधान केले होते. ज्या प्रकारे एक न्हावी तीन- चार ग्राहक असतील तर प्रत्येकाची अर्धी-अर्धी हजामत करतात तशाप्रकारे काँग्रेसने प्रत्येक ठेकेदाराला मलाई देऊन कामं अर्धवट ठेवली होती, असे त्यांनी म्हटले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर नाभिक संघटना नाराज झाल्या असून, मंगळवारी यवतमाळमधील नाभिक संघटनेने थेट भाजपलाच इशारा दिला. भाजपचे मंत्री, आमदार, कार्यकर्ते आणि नेत्यांची दाढी व कटिंग करायची नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय नक्षणे यांनी दिली. नाभिक समाज हा प्रामाणिकपणे काम करुन उदरनिर्वाह करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या अन्य भागांमध्येही नाभिक समाजाने आंदोलन केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी नाभिक समाजाची मागणी आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments