जगप्रसिद्ध अल् अदिल ट्रेडिंग ग्रुपच्या संचालिका सौ. वंदना दातार यांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन
पंढरपूर Live 12 NOVEMBER 2017
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
पंढरपूर Live 12 NOVEMBER 2017
पंढरपूर, ता. 12 : दुबईतील जगप्रसिद्ध अल् अदिल ट्रेडिंग ग्रुपचे मालक मसाला किंग धनंजय दातार यांच्या पत्नी तथा अल् अदिल ट्रेडिंग ग्रुपच्या संचालिका सौ. वंदना दातार यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्यावतीने श्री. धनाजी माने व पोलिस उपनिरीक्षक श्री. वाळके यांच्या हस्ते सौ. दातार यांचा सत्कार करण्यात आला. मराठी भाषिक असणारे धनंजय दातार यांनी दुबईसह सौदी अरेबिया, अमेरिका, बहरीन आदी देशांमध्ये अल् अदिल ट्रेडिंग ग्रुपचे जाळे विणले असून, जागतिक मसाले बाजारपेठेत मोठे नाव कमाविले आहे. त्यांच्या पत्नी सौ. वंदना दातार या मूळच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रहिवासी असून, त्यांनी कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठातून उच्चशिक्षण प्राप्त केले आहे. अल् अदिल ट्रेडिंग ग्रुपच्या वित्तीय संचालिका या पदावर सध्यात्या कार्यरत आहेत.
संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





0 Comments