सहा महिन्यात एसबीआयकडून १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

सहा महिन्यात एसबीआयकडून १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

पंढरपूर Live 15 NOVEMBER 2017
नवी दिल्ली : देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये एसबीआयने १० हजारांहून अधिक जणांना नारळ दिला आहे. यासोबतच या कालावधीत एसबीआयने कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रियाही जवळपास थांबवली आहे.आठ महिन्यांपूर्वीच एसबीआयमध्ये पाच बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. याशिवाय महिला बँकदेखील एसबीआयमध्ये विलीन करण्यात आली. पाच बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यंदाच्या वर्षातील १ एप्रिल रोजी स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे या सर्व बँका एसबीआयच्या अंतर्गत आल्या.विलीनीकरणामुळे एसबीआयच्या देशभरातील शाखांची एकूण संख्या ६ हजार ४८७ ने वाढली. त्यामुळे एसबीआयच्या शाखांची संख्या २३ हजार ४२३ वर जाऊन पोहोचली. मार्च २०१७ मध्ये एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ७९ हजार ८०३ इतकी होती. सप्टेंबरअखेरीस हा आकडा २ लाख ६९ हजार २१९ वर आला आहे. या कालावधीत स्टेट बँकेने केवळ ७९८ कर्मचाऱ्यांची भरती केली.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments