फक्त महिलाच नव्हे तर, पुरुषांनासुद्धा लैंगिक शोषणाचा शिकार व्हावे लागते-राधिका आपटे


पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017
गेल्या काही दिवसांपासून, कास्टिंग काऊच, हार्वी विनस्टीन, लैंगिक शोषण अशा बऱ्याच गोष्टींच्या चर्चा रंगत आहेत. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी मोठ्या धाडसाने पुढे येत या मुद्द्यावर आपले अनुभवही सर्वांसमोर मांडले. कलाविश्वात करिअर करण्याची आशा मनी बाळगणाऱ्या बऱ्याच होतकरु कलाकारांना आजवर कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. मुख्य म्हणजे कलाकारांनीही ही गोष्ट कधीच नाकारली नाही. काही दिवसांपूर्वीच ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अभिनेता इरफान खान याने तर चित्रपटसृष्टीत आपल्यालाही तडजोड करण्याची विचारणा करण्यात आली होती, ही बाब उघड केली.
इरफानच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या किंबहुना पुरुषांचे लैंगिक शोषण होते, यावर बऱ्याचजणांचा विश्वासच बसत नव्हता. याविषयीच आता अभिनेत्री राधिका आपटेने एक खुलासा केला आहे. चित्रपट विश्वात पुरुषही लैंगिक शोषणाचा शिकार होतात, असे तिने स्पष्ट केले आहे. ‘भाषा’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘फक्त महिलाच नव्हे तर, पुरुषांनासुद्धा लैंगिक शोषणाचा शिकार व्हावे लागते. मी अशा काही पुरुषांना ओळखतेसुद्धा ज्यांना या साऱ्याला सामोरे जावे लागते आहे’. अभिनेत्री सनी लिओनीनेही काही दिवसांपूर्वी अशीच भूमिका मांडली होती. राधिका आपटेनेही हा मुद्दा मांडताना तिचीच री ओढली.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments