सोलापुरात शनिवार, रविवारी ग्रंथमहोत्सवाचे आयोजन

पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017

सोलापूर दि. 22 :-  वाचन संस्कृती वाढावी, ग्रंथप्रेमी वाचकांना एकाच ठिकाणी दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत येत्या 25, 26 नोव्हेंबर 2017 रोजी ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात होणार आहे. दोन दिवसात ग्रंथ प्रदर्शनाबरोबरच विविध साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख यांनी दिली आहे.


ग्रंथमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी दुपारी अडीच वाजता ग्रंथदिंडी आयोजित केली जाणार आहे. दुपारी चार वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव गणेश मंझा, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक श्रीकांत येळेगांवकर, प्रा.डॉ. नभा काकडे, हरिदास रणदिवे आदी उपस्थित राहणारे आहेत. याच दिवशी समीक्षक आणि अनुवादक निशीकांत ठकार यांची प्रकट मुलाखत जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी घेणार आहेत.

रविवारी, 26 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता कविवर्य विंदा करंदीकर यांचे व्यक्तित्वदर्शन व त्यांच्या कवितांवर आधारित ‘विंदायन’ कार्यक्रम होईल. दुपारी 2 ते 3.00 वाजता काव्यरंग कविसंमेलन होईल. यामध्ये माधव पवार, वंदना कुलकर्णी, सुयश कवीटकर, ओंकार काळे, विशाल सुतार, विश्वनाथ जोकारे, प्रांजली मोहीकर, प्राची साठ्ये, प्रशांत रत्नपारखी, सागर अचलकर सहभागी होणार आहेत.

दुसऱ्या सत्रात दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टडी सर्कलचे संचालक डॉ. आनंद पाटील मार्गदर्शन करतील. सायंकाळी सव्वापाच वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी अप्पर कोषागार अधिकारी सु.श्री.खटके आणि प्रा. विशाल गरड उपस्थित राहणार आहेत. या ग्रंथोमहोत्सवात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती देशमुख यांनी केले आहे.



13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments