त्रिवर्षपूर्तीनिमित्त महसूलमंत्र्यांचा सन्मान

त्रिवर्षपूर्तीनिमित्त महसूलमंत्र्यांचा सन्मान

पंढरपूर Live 11 NOVEMBER 2017

महाराष्ट्रातील भाजपाच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शहर भाजपच्या वतीने सत्कार करताना सरचिटणीस संजय वाईकर, भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा शकुंतला नडगिरे, चिटणीस शंतनु दंडवते, आदित्य जोशी, गणेश गोमासे आदी.

पंढरपूर (प्रतिनिधी) : 31 ऑक्टोबर 2014 रोजी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत वानखेडे मैदानावर जाहीर शपथविधी घेतलेल्या राज्यातील फडणवीस सरकारला आज तीन वर्षे पूर्ण झाली. योगायोगाने आज कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे प्रतिनिधी म्हणून महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे शासनाच्या वतीने सपत्नीक पूजा करण्यासाठी पंढरपूर येथे आले होते.
श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा पूर्ण झाल्यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपात राज्यातील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल (त्रिवर्षपूर्तीनिमित्त) पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संजय वाईकर यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा श्रीसंत तुकोबांची वारकरी सांप्रदायातील पगडी, वारकरी सांप्रदायाचे उपरणे व श्री विठ्ठलाची रजत प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला. 
यावेळी त्यांच्या समवेत भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, चिटणीस शंतनु दंडवते, आदित्य जोशी, गणेश गोमासे उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments