मंगळवेढा तालुक्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्याचा लिलाव

मंगळवेढा तालुक्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्याचा लिलाव

पंढरपूर Live 14 NOVEMBER 2017

           पंढरपूर, दि. 14 :- मंगळवेढा तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलावसोमवार दिनांक 20  नोंव्हेबर 2017 रोजी सकाळी 11.00 उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहितीउपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली.
            मंगळवेढा तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठे व वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे  924 ब्रास  वाळू जप्त केली असून हा वाळू  साठा मार्तुलिंग हायस्कुलसिद्धापूरतालुका मंगळवेढा येथे ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत प्रति ब्रास 4 हजार प्रमाणे सुमारे 36 लाख 96 रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. सदर लिलावात भाग घेण्यासाठी  2 हजार रुपये विनापरतावा अर्ज फी आणि  सरकारी बोली किंमतीच्या 20 टक्के म्हणजेच  7 लाख 39 हजार 200 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. लिलावात सर्वोत्तम बोलीची रक्कम लावलेल्या  लिलावधारकाने  संपूर्ण रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी. लिलावधारकाने लिलावाची रक्कम भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी केले आहे. 
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments