लोटस इंग्लिश स्कुल चा टोपान प्रिंटिग कं. लि. या जापनीज कंपनी समवेत करार


पंढरपूर Live 20 NOVEMBER 2017
पंढरपूर– कासेगाव (ता.-पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुलने नुकताच टोपान प्रिंटिग कं. लि., टोकिओ जपान या कंपनीशी त्यांच्या यारोकी या शैक्षणिक प्लॅटफॉर्मच्या पायलटचा अभ्यास करण्याबद्दलचा सामंजस्य करार केला आहे . या पायलट स्टडीचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांची गणित विषयाचीमनामध्ये असलेली भिती दूर करून सेल्फ लर्निंगद्वारे गणितातील गोडी निर्माण करण्यासाठी होईल आणि गणितावरील प्रभुत्व मिळवण्यासाठी होईल. शिक्षकांना वर्गात टॅबद्वारे क्लासवर्क आणि होमवर्क देणे शक्य होईल. टॅबवरच प्रत्येक मुलाची प्रगती बघणे आणि त्यानुसार त्याला वैयक्तिक सल्ला देणे शक्य होईल. या पायलट स्टडी प्रकल्पासाठी टोपान कंपनी सर्व मुलांना व शिक्षकांना मोफत टॅब आणि यारोकि अॅप्लीकेशन देणार आहे.

       लोट्स इंग्लिश स्कूलची स्थापना २०१० साली झाली असून स्थापनेपासून विद्यार्थ्यांच्यासर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवीत असताना विद्यार्थ्यांना देखीलनवनवीन प्रकारच्या अभ्यासातील उपक्रमामुळे यामध्ये गोडी निर्माण होत आहे. याचा एक भाग म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. याकरारातील प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना जपानी पध्दतीने गणित शिकण्याची संधी मिळणार आहे. गणितातील प्रभुत्वामुळेच जपानने आज जगात सर्वच क्षेत्रात अतिशय उल्लेखनिय प्रगती केली आहे. याबददल सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की टोपानने निवडलेल्या शाळांमध्ये मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील लोटस इंग्लिश स्कुल ही एकमेव शाळा आहे. या करारामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.या करारावर टोपान प्रिंटींग कं. लि.,टोकियो, जपान या कंपनी परदेशातील व्यवसाय प्रमुख औकी कजीरो व संस्थेचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments