पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे एकास दगडाने मारहाण

पंढरपूर  तालुक्यातील देगाव येथे एकास दगडाने मारहाण 

12 NOVEMBER 2017
पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे एकास गावातीलच काहीजणांनी शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात अशोक चिमाजी घाडगे (वय 51), रा. देगाव, ता. पंढरपूर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 12-11-2017 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी व त्यांचा मुलगा देगाव येथील भैरवनाथ मंदिराजवळून मोटारसायकलवरून जात असताना आरोपी संतोष तुकाराम डांगे, रा. देगाव याने व इतर आरोपींनी "तुम्ही इकडे का आला?" असे विचारत फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादीच्या गचुरीला धरून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी सिताराम तुकाराम डांगे याने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर कपाळावर दगड मारला.

याबाबत  आरोपी  छाया तुकाराम डांगे, तिच्या दोन सुना, संतोष तुकाराम डांगे, सिताराम तुकाराम डांगे व अनिल बाबासाहेब चव्हाण  (सर्व रा.देगाव) यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 149, 324, 323,  504 अन्वयार्थ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाॅ. क्षीरसागर हे करीत आहेत.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments