जिल्ह्यातील नगरपालिका केरोसीन मुक्त करा


पंढरपूर Live 18 NOVEMBER 2017

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या आढावा बैठकीत सूचना
सोलापूर दि. 18 :­- सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका केरोसीन मुक्त करा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज येथे दिल्या.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा पुरवठा कार्यालय आणि अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाची आढावा बैठक झाली. बैठकीस पालकमंत्री विजय देशमुख, पुरवठा उपायुक्त निलीमा धायगुडे, अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी आणि सर्व तहसिलदार उपस्थित होते.
मंत्री बापट म्हणाले, ‘सोलापूर शहर केरोसीनमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे  प्रदूषणात कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नगरपालिका हद्दीत शंभर टक्के कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन दिले जाऊन केरोसीनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जावेत’.
घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांविरुध्द मोहिम उघडली जावी. असे करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल केले जावेत. जेणेकरुन घरगुती गॅसचा अवैधरितीने वापर करण्यावर आळा येईल असे त्यांनी सांगितले. तहसिलदारांनी महिन्यातून  किमान सहा रास्त भाव धान्य दुकानांची तपासणी करावी. गैरप्रकार करणाऱ्या दुकानांवर करावाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात गोदामे उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी काही गोदामे उभारण्यात आली आहेत. अपूर्ण राहिलेली गोदामे शासकीय जागा उपलब्ध करुन घेऊन उभारली जावी, असेही श्री. बापट यांनी सांगितले. गोदामे उभी करण्यासाठी पब्लिक - प्रायव्हेट - पार्टनरशिप मॉडेल वापरता येते का याचा विचार केला जावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, स्नेहा उबाळे, मारुती बोरकर, ज्योती पाटील, तहसिलदार सदाशिव पडदुणे, संजय पवार, संजय पाटील, मुधुसुदन बर्गे आदी उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments