पंढरीतील सुप्रसिद्ध चार्डर्ड अकौंटंट (CA) श्रीरंग देशपांडे यांचे अपघाती निधन

पंढरीतील सुप्रसिद्ध चार्डर्ड अकौंटंट (CA) श्रीरंग देशपांडे यांचे अपघाती निधन 

पंढरपूर Live 18 NOVEMBER 2017

पंढरीतील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट (CA) श्रीरंग देशपांडे  (वय अंदाजे55), रा. मनिषा नगर, पंढरपूर हे काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास येथील उमा काॅलेजजवळच्या श्वास हाॅस्पिटल समोरून आपल्या बुलेट गाडी (MH 13 CP 3013) वरून जात असताना समोरून आलेल्या शाईन गाडी (MH 13 PU 4011) ची व त्यांच्या बुलेटची समोरासमोर धडक होवून अपघात झाला होता. यात देशपांडे व इतर तीघे जखमी झाले होते. आज उपचारादरम्यान देशपांडे यांचे निधन झाले.

याबाबत काल रात्री अपघाताची खबर सागर राजू मिसाळ , रा. पंढरपूर यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार रात्री वरील वेळी  व ठिकाणी योगेश कोळी, त्रिलोक मस्के, सागर मिसाळ (सर्व रा.पंढरपूर) हे नविन कराड नाक्यावरून शाईन या दुचाकीवरून येत होते तर देशपांडे बुलेटवरून उमा काॅलेजकडे जात होते दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक बसली. यात सर्वजण जखमी झाले होते. सर्वांवर उपचार चालु होते.  आज सोलापुरात उपचारादरम्यान देशपांडे यांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळतेय. अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस वाहतूक शाखेचे पीएसआय चव्हाण हे करीत आहेत.

अपघात मयत झालेले देशपांडे हं पंढरीतील नावाजलेले सीए होते. त्यांचे मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments