यूथ पार्लमेंट चॅम्पियनशीप वक्तृत्वस्पर्ध्येत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा संघ प्रथम


पंढरपूर Live 21 December 2017
यूथ पार्लमेंट चॅम्पियनशीप वक्तृत्वस्पर्ध्येत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा संघ प्रथम
पंढरपूर: - रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महविद्यालयातील  कु. तेजश्री भारत सोनवणे ( बी. एस्सी. भाग- तीन )  कु. पूजा हनुमंत खपाले  ( बी. एस्सी. भाग- तीन ) कु. मोनाली शामराव कुसुमडे ( बी. एस्सी. भाग-तीन) वाङ्मयमंडळतील तीन विद्यार्थ्यानींच्या संघाने यूथ पार्लमेंट चॅम्पियनशीप उपविभागीय स्तरावर वक्तृत्वस्पर्ध्येत प्रथम क्रमांक मिळविला. ही स्पर्धा स्वेरी कॉलेज, पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, पंढरपूर सोलापूर ग्रामीण विभागामार्फत आयोजित केली होती. पंढरपूर विभाग, पंढरपूर सहा. पोलीस अधीक्षक मा. श्री. निखील पिंगळे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य सिताराम गोसावी, कलाविभागाचे उपप्राचार्य बी. जे. तोडकरी,  वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. जे. एस. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम  या मान्यवरांनी  अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनींना वाङ्मयमंडळाचे चेअरमन  प्रा. ए. एस. माळी  यांचे मार्गदर्शन लाभले.   तसेच या यशाबद्दल  महाविद्यायातील  शिक्षक-शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी- विद्यार्थींनी  यांनी अभिनंदन केले. या यशस्वी स्पर्धकांना  पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments