स्वाधार योजनेसाठी अर्जाची 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2018
स्वाधार योजनेसाठी अर्जाची
 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत

सोलापूर दि. 02 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत अर्ज करण्याची मुदत असल्याची माहिती, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सेालापूर यांनी दिली.
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवर्बाध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मोफत, निवास व इतर शैक्षणिक सुविधा देण्यासाठी शासनाकडून मदत दिली जाते. यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या रहिवाशी जिल्ह्यामध्ये (विद्यार्थी जिल्हा) या योजनेसाठी अर्ज करावयाचा होता. यामध्ये बदल करण्यात येवून विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे (कॉलेज जिल्हा) त्याच जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाकडे अर्ज करु शकतो.
योजनेच्या लाभासाठी अर्जाचा नमूना http://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोडकरुन घ्यावा व आपला अर्ज  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर येथे समक्ष, टपालाने अथवा swadhar.swsolapur@gmail.com  या ईमेल वर पाठवावा. अधिक माहितीसाठी 0217-2734950 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
व्यवसाय परीक्षेसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर दि. 02 :- शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी खाजगी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेण्यात येणारी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जानेवारी 2019 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी आपले विहित नमूण्यातील अर्ज दिनांक 16  फेब्रुवारी ते 5 मार्च 2018 या कालावधीत सादर करावेत. विहित नमूण्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments