महिला उद्योजकांचा गौरव 5 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018

 सोलापूर दि. 01 : - सुक्ष्म, लघु व मध्यम घटकातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजकांचा शासनामार्फत गौरव करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व इच्छुक महिला उद्योजकांनी आपले प्रस्ताव दि. 5 फेब्रुवारी 2018 पर्यंत उद्योग सह संचालक, पुणे विभाग, पुणे यांच्याकडे सादर करावेत असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते यांनी कळविले आहे.
एकल मालकी गट, भागीदारी घटक, सहकारी क्षेत्र, खाजगी किंवा सार्वजनिक मार्यादित घटक आणि स्वयं सहाय्यता बचत गट या घटकातील महिला उद्योजकांनी यासाठी अर्ज करावेत. या घटकामध्ये 50 टक्के महिला कामगार असणे आवश्यक आहे. तसेच एकल मालकी घटकात महिला उद्योजकांचे 100 टक्के भाग भांडवल, भागीदारी घटकात 100 टक्के भाग भांडवल, सहकारी क्षेत्रामध्ये सहकार कायद्याअंतर्गत ज्या सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के महिला उद्योजकांचा समावेश असलेली संस्था, खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटकामध्ये महिला उद्योजकांचे 100 टक्के भाग भांडवल असेल अशी कंपनी आणि स्वयं सहाय्यता बचत गटामध्ये जो बचत गट नोंदणीकृत असावेत.
                पुरस्कारार्थी महिला उद्योजिका ही दिनांक 14.12.2017 च्या शासन निर्णयामध्ये विहीत करण्यात आलेल्या महिला उद्योजकांच्या व्याख्येमध्ये बसणारी असावी. उद्योग घटक गेल्या 3 वर्षात सतत उत्पादनात असावा. सदरच्या महिला उद्योग घटकास राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत यापूर्वी कुठलाही पुरस्कार मिळालेला नसावा. उद्योग घटकाची निवड करताना विविध मुद्यांचा समावेश करण्यात येईल जसे गेल्या 3 वर्षात घटकांचे उत्पादन, रोजगार निर्मिती, गुंतवणूक व नफा याव्दारे दिलेला वाढीचा दर, तंत्रज्ञानाची निवड व वापर ( स्वत: विकसित केलेले/ स्वदेशी / परदेशी) उद्योजिकेची पार्श्वभूमी, प्रथम (संशोधन व विकासासाठीचे प्रयत्न, गुणवत्ता नियंत्रणासाठीची उपाय इ.) आयात पर्यायी उत्पादन व निर्यात, डायर्व्हसिफीकेशन व बाजारपेठेत नव्या उत्पादनाचा यशस्वीपणे समावेश, उद्योगाचे व्यवस्थापन यामध्ये इन्व्हेटरी कंट्रोल, लेखे, मार्केटिंग बाबत, कामगार कल्याण, उद्योजिका अनु.जाती / अनु.जमातीची असल्यास अधिकचे गुण इ. निकषाचा विचार करून पुरस्कार देण्यात येतील.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments