लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2018
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे माहेरी जाण्याच्या कारणावरुन नवरा बायकोचा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात फावड्याने मारहाण केली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेत मृत्यु झालेली महिला ही 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे व परस्पर पोष्टमार्टेम केल्याने तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास मृत महिलेच्या माहेरच्यांनी नकार दिल्याचे समजते.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याकडून समजलेली प्राथमिक माहिती अशी की, आज दुपारी गादेगाव येथील सातारा नाला, बागल वस्ती, ता. पंढरपूर (भंडीशेगाव हद्द) येथे शेतात काम करत असताना पत्नीच्या माहेरी जाण्याच्या हट्टामधून पती-पत्नीमध्ये वाद झाला हा वाद विकोपाला गेला. पती विजय जालिंदर बागल (वय अंदाजे 30) याने रागाच्या भरात आपली पत्नी पल्लवी विजय बागल (वय-अंदाजे 27) हिच्या डोक्यात फावडा घातला. यात तिचा जागीच मृत्यु झाला. या घटनेत पती सुध्दा जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूरमधील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या भांडणात मलाही पत्नीने मारहाण केल्याचा आरोप आरोपी पतीने पोलिसांसमोर केला असल्याचे समजते.
घटनेचे वृत्त समजताच तातडीने पंढरपूरचे डीवायएसपी निखील पिंगळे व पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. खराडे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली. सदर महिलेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. या गुन्ह्याची नोंद करण्याचे कामकाज पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात सुरु आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाचा अधिक तपास पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पीएसआय गायकवाड हे करत आहेत.तपास
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
0 Comments