लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2018
कर्नाटक,पंजाब,तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतकर्यांना मोफत विज पुरवठा करण्याचा निर्णय राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात जाहीर करा,थकीत वीजबिलापोटी सद्या शेतकर्यांचे वीजकनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून राबवीली जात आहे ती तात्काळ थांबवा व थकीत बीलापोटी डि.पी.उतरवून शेतकर्यांना व दुभत्या जनावरांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचीत ठेवण्याचे प्रकार बंद करा आदी मागण्यांसाठी आज शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री सोनंदकर यांना निवेदन देण्यात आले.
या बाबत अधिक माहिती देताना प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की, देशातील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेल्याने आत्महत्या करीत आहे.कृषी मालाचे दर घसरल्याने शेतकरी प्रचंड अर्थिक नुकसान सोसत आहे.असे असताना महावितरणच्या वतीने सद्या शेतकर्यांकडून विजबिलाची जबरी वसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे.डि.पी.उतरवून शेतकर्यांना व दुभत्या जनावरांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचीत ठेवण्याचे पाप केले जात आहे.हा प्रकार शेतकर्यांवर मोठा अन्याय करणारा आहे.या निवेदनाची दखल राज्याच्या उर्जामंत्र्यानी व महावितरणच्या संबधीत अधिकार्यांनी न घेतल्यास शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबीया यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
हे निवेदन देताना संतोष कवडे,प्रशांत पवार,प्रविण कोळेकर,मनोज पवार,पप्पू कोळेकर,हनुमंत चव्हाण,सागर ढवण,बालाजी खंदारे,विजय घाडगे,रवी यादव यांच्यासह शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments