लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 फेब्रुवारी 2018
अनिल चौधरी, कोंढवा : येथील गावातील तरुणांच्या वतीने पीएमपीएमएल चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदलीच्या विरोधात आज निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी चांगल्या अधिकाऱ्याची बदली झालीच पाहिजे असे उद्दीग्नपणे प्रश्न विचारात सरकारला जाब विचारला आहे. हीच का सरकारची पारदर्शकता असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला.
याप्रसंगी बोलताना महेश लोणकर म्हणाले , सरकारने अतिशय शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंडे यांची पीएमपीएमएल च्या अध्यक्षपदी नेमणूक केली होती.त्यांच्या कार्यकाळात कामात कुचराई करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. तोट्यात गेलेल्या पीएमपीएलला शिस्त लावण्यासाठी मुंढेंनी कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे पीएमपीएलला चे वार्षिक उत्पन्न देखील वाढले होते.प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. तसेच अनेक धाडशी निर्णय त्यांनी घेतले होते. परंतु तसंच त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या अनेक निर्णयांना नगरसेवकांनी तीव्र विरोध केला होता. मात्र मुंढेंनी आपला आपले निर्णय रेटून नेले. त्यामुळे त्यांच्याविरोधात नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्याचीच दखल घेत अखेर मुंढेंना वर्षभराच्या आतच पीएमपीएवरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. सरकारने चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयन्त केले पाहिजेत . परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे चांगल्या अधिकाऱ्याची विकेट गेली आहे.
दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे अधिकारी पदाधिकाऱ्यांचे धाबे दणादणले आहेत. काही करुन मुंढेंची बदली लांबणीवर पडावी, यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवल्याचं म्हटलं जात आहे.
यावेळी महेश लोणकर , गणेश लोणकर , सागर लोणकर, अतुल जवळकर, विवेक पांगारे, रोहित लोणकर, उमेश मांगले,तांबे , महेश बोईटे, बापू मुलानी, बन्सी कसबे, साईराज लोणकर, अक्षय झुरुंगे तसेच इतर कोंढवा खुर्द ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments