श्री. विठ्ठल इंजिनिअरिंगमध्ये ‘ऋणानुबंध२०१८’ संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!



पंढरपूर LIVE 12 मार्च 2018

माजी विद्यार्थ्यांनी समाजाला ज्ञानी करावे  - अडॉर वेल्डिंगचे मुख्य व्यवस्थापक सतिश भट 
पंढरपूरः- अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाकडे फिरकत देखील नाहीत परंतु येथील चित्र वेगळे दिसत असून नेहमीच्याच क्लास प्रमाणे  विद्यार्थी आज या ठिकाणी जमले आहेत. खरे तर माजी  विद्यार्थी हे महाविद्यालयाचे घटकच असतात. ते शिक्षणानंतर येथून निघून जातात खरेपण त्यांना पुढे कॉलेज जीवनाची आठवण मात्र सातत्याने येत असते हे ते मुळीच नाकारु शकत नाहीत. आपण या ठिकाणी शिकलो याचेच समाजाला काहीतरी देणं लागतो हा दृष्टीकोन ठेऊन आपण देखील भविष्यात समाजाला ज्ञानदान करावे.’ असे प्रतिपादन मुंबई मधील अडॉर वेल्डिंग कंपनीचे मुख्य व्यवस्थापक सतीश भट  यांनी  केले.

                श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा अर्थात ऋणानुबंध २०१८च्या बहारदार कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य व्यवस्थापक सतीश भट हे माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.  या मेळाव्यात कोणी प्रशासकिय अधिकारी होतेतर कोणी स्वतःच कंपनीची निर्मिती केली होती. कोणी परदेशात स्थायिक झाले होते तर काहीजणी गृहिणी झाल्या होत्या. काही मुली पतीला सहकार्य करण्यासाठी जॉब स्वीकारला होता आणि हे सर्वचजण माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने स्वेरी कॅम्पसमध्ये एकत्रित आले होते. काहीजण दोनाचे तीनतीनाचे चार झाले होते तर काहीजण एम.ई करुन पी.एच.डी. संशोधन करण्यात गुंतलेले होते. आजमात्र ते सर्वजण स्वेरी कॅम्पसमध्ये आठवणींच्या हिंदोळ्यांवर मनसोक्त झुलत होते. कॉलेज जीवन संपल्यानंतर त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आलेले विद्यार्थी देखील जणूऋणानुबंध २०१८’ कार्यक्रम हा ट्रेडीशनल डे’ आहे की काय या जोशात नटून थटून आले होते. ते आपसात चर्चेत गुंतले असतानाच प्रमुख मान्यवरांचे आगमन झाले. मुख्य पोर्चमध्येच यथोचित स्वागत होत होते.  प्रारंभी  स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी मेळावा आयोजिन्यामागचा हेतू सांगून महाविद्यालयाची वाटचाल सांगितली.संकल्प मस्के, सुहास बागल, चैतन्य परचुरे, स्वप्नील घोगरदरे,अविनाश कांबळे, अजिंक्य देह्मुख, शुभम वालावडकर, पोपट आसबे, अजित लोखंडे या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पैसे सर्वचजण मिळवतातपरंतु अनुभव हा स्वतःलाच मिळवावा लागतो. त्यासाठी हार्ड वर्कची गरज असते. कारण आईच्या कुशीनंतर महाविद्यालयीन जीवनातच प्रेम, आपुलकी मिळते. आम्हाला घडविण्यासाठी स्वेरीच्या प्राध्यापकांनी वेळ प्रसंगी आमच्या भवितव्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचा सुरवातीला राग आला परंतु आम्ही ज्यावेळी कंपनीत नोकरीकरिता रुजू झालो त्यावेळी येथील शिस्त व केलेले संस्कार याचा खूप फायदा होतो हे लक्षात आले. त्यामुळे येथील अभ्यासू वातावरणाला  व उच्च शिक्ष्ट प्राध्यापकांना आम्ही मनापासून वंदन करतो.‘ असे म्हणत काही जण भावनिक देखील झाले होते तर काही जणांनी जागतिक स्तरावर रुजवलेल्या शिस्तीचा फायदा कसा होतो ? हे पटवून दिले. अनंत आंधळे म्हणाले की, माजी विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत. त्यांना कॉलेज  संपल्यानंतर जबाबदारीची जाणिव होते. शिस्तीचा फायदा त्वरीत न होता नोकरी लागल्यानंतर होतो. या शिस्तीमुळेच आपल्यात बदल होतो व नोकरीत पदोन्नती होते.आपल्यातील संभाषण पध्दत व घडलेले संस्कार’ यावर नोकरीमधील गुणवत्ता दिसुन येते.असे सांगितले. पुढे बोलताना  सतीश भट म्हणाले की , विद्यार्थ्यांनी  महाविद्यालयात शिक्षण घेवून बाहेर पडल्यानंतर आपल्यावरील ऋण फेडावे. आपल्या अडचणी सोडविताना कामातील कार्यक्षमतासंयम,गुणवत्ता याचा फायदा होतो.’ असे सांगुन विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन (संवाद) विरुद्ध विचार स्पष्टता, कौशल्य विरुद्ध दृष्टीकोन, नातेसंबंध विरुद्ध चांगले काम, नियंत्रण विरुद्ध सबलीकरण, अंमलबजावणी विरुद्ध नियोजन, आक्रमकपणाविरुद्ध आग्रहीपणा, बोलणे विरुद्ध ऐकणे, ओळखपत्रे किंवा प्रमाणपत्रे विरुद्ध आत्मविश्वास, अंगीकृत विरुद्ध नैसर्गिक वर्तणूक व हार्ड वर्क विरुद्ध स्मार्ट वर्क ही यशाची १० सूत्री सांगून प्रत्तेक जोडीतील दुसऱ्या गोष्टीचे महात्म्य उदाहरणांसह पटवून दिले.यावेळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभर कॅम्पसमध्ये फिरून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी विविध क्लासमध्ये जावून नोकरी करत असताना आलेला अनुभव व येणारी अडचण’ यावर बहुमोल टिप्स दिल्या.त्यानंतर सर्वांनी आपल्या शिक्षकांनाविविध विभागांना भेटी देवून शिक्षणातील प्रगती जाणून घेतली.त्यानंतर परिसरातील बागेमध्ये अनेक जण जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी विशेष पोज देवून छायाचित्र काढत होते.यामध्ये अभियात्रिंकीच्या स्थापनेपासून ते गतवर्षी उत्तीर्ण पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ऋणानुबंध २०१८ हा मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.माधव राऊळ यांच्या नेतृत्वाखाली प्रा. श्रीनिवास दर्शने,विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा करण पाटील, सचिन डुबल यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर व मृणालिनी माने यांनी केले तर स्वेरीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी आभार मानले.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments