स्वेरी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पुन्हा आघाडीवर

चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 26 मार्च 2018

यादीत सोलापूर जिल्ह्यातील स्वेरी एकमेव महाविद्यालय
पंढरपूर- केंद्रशासनाच्या एम.एच.आर.डी-एन.आई. आर.एफ. २०१८ नुसार रँकिंगमध्ये देशभरातील जवळपास ८७० पेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रातील जवळपास १३० महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. एम.एच.आर.डी- एन.आई. आर.एफ च्या संकेत स्थळावर ५०% पेक्षा अधिक कॅम्पस प्लेसमेंट असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील अवघ्या ४२ महाविद्यालयांचा समावेश असून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात दबदबा असलेल्या, विक्रमाचे सर्व विक्रम तोडून नवीन विक्रम स्थापित करणाऱ्या स्वेरी तथा श्री विठ्ठल शिक्षण व संशोधन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर. याच महाविद्यालायाने स्थान मिळविले आहे.

             महाराष्ट्रामध्ये एकूण तंत्रशिक्षणाच्या ३६० पेक्षा जास्त महाविद्यालये असून त्यात बऱ्याच गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलांनी शैक्षणिक कर्ज घेऊन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहेत. आता खाजगी कॉन्सुलटंट्स नौकारीचे अमिष दाखहून विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी कमीत कमी ४ ते ८ लाख रुपये खर्च येतो. तसेच महाराष्ट्रातील ४० पेक्षा कमी अभियांत्रिकी महाविद्यालयाना NBA या शिखर संस्थेचे मानांकन प्राप्त असून अभियांत्रिकी शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी बारावीच्या विद्यार्थ्यानी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी नीट विचारपूर्वक निर्णय घ्यावा.५०% पेक्षा अधिक कॅम्पस प्लेसमेंट असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची यादी campusengineer.com या संकेतस्तळावर प्रसिद्ध झाली असून सोलापूर जिल्ह्यातून स्वेरी या एकमेव महाविद्यालयाचा समावेश असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता गरुडझेप घेत आहेत हे स्पष्ट होत आहे.

 १९९८ साली स्थापित झालेल्या स्वेरीने प्रारंभी पासून विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी सतत परिश्रम घेत असून  कॅम्पस प्लेसमेंटमध्ये देखील ‘स्वेरी’ अग्रेसर कसे राहील ? याकडे  स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी लक्ष घालून केवळ विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून प्लेसमेंटसाठी स्वतंत्र विभाग स्थापित करून विद्यार्थ्यांचे कॅम्पस प्लेसमेंट होण्यासाठी विभागात उच्च शिक्षित प्राध्यापकांची निवड केली असून ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षापासूनच प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात नोकरीच्या ठिकाणी इंग्रजी संभाषण कसे असावे? समोरच्या व्यक्तींशी बोलताना बॉडी लेन्ग्वेज,संभाषणातील चढ उतार कसे असावे व या संबंधी प्रशिक्षण देखील दिले जाते. एवढेच नव्हे तर गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांवर संस्कार बिंबविले जात आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय दर्जाच्या मोठमोठ्या कंपन्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट करण्यासाठी जवळपास स्वेरीत येतात.कंपनीला पाहिजे तसे विद्यार्थी स्वेरीतून घडविल्यामुळे स्वेरी प्लेसमेंटमध्ये आघाडीवर आहे. 

याचीच दखल एम.एच.आर.डी- एन.आई. आर.एफ. या केंद्र शासनाच्या विभागाने घेतली. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय असल्यामुळे पालकांमध्ये अधिक उत्साही वातावरण दिसून येत असून सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्यासह ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट विभागामध्ये सतत कार्यमग्न राहणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन होत आहे.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments