कासेगाव येथील अंश इंडस्ट्रिज या कोरोगेटेड बॉक्स कारखान्यास आग युवा उद्योजकाचे लाखो रुपयांचे नुकसान

चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 26 मार्च 2018

पंंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर अनवली रस्त्यावरील कासेगाव हद्दीत असलेल्या अंश इंडस्ट्रिज या कोरोगेटेड बॉक्स तयार करणार्‍या कारखान्यास रविवारी पहाटे 2 च्या सुमारास शॉटसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेची  पंढरपूर नगरपालीकेच्या अग्नीशमन दलास माहीती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.मात्र तो पर्यंत आगीने रुद्र रुप धारण केल्याने संपुर्ण कारखाना व येथील यंत्रसामुग्री,तयार व कच्चा माल आगीच्या भक्षस्थानी पडला.

         अनवली येथील युवा उद्योजक बाळकृष्ण दिगंबर सुर्यवंशी यांनी बेदाणा व दाळींबासाठी लागणार्‍या बॉक्सची गरज ल क्षात घेवून मोठया जिद्दीने 2015 मध्ये हा कारखाना उभा केला होता.संपुर्ण सोलापुर जिल्ह्यात येथे तयार होणार्‍या कोरोगेटेड बॉक्सला मागणी होती.गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु असतानाच या आगीच्या घटनेमुळे हा कारखाना पुरता उध्वस्त झाला असून एका युवा उद्योजकाच्या यशस्वीपणे सुरु असलेल्या व्यवसायावर आपत्ती आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments