लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 मार्च 2018
पंढरपूर ः दि.14 - सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी राज्यातील बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाच्या जमिनीवर गरीबांना व मध्यमवर्गीय कुटूंबांना परवडणारी घरे बांधणेबाबत महाराष्ट्र विधानमंडळामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला. राज्यातील बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाच्या विना वापर असलेल्या जमिनीवर घरे बांधण्याबरोबर त्याठिकाणी रोजगार निर्मितीलाही प्राधान्य देण्याचा निर्णय दि.08.01.2018 रोजी घेण्यात आला आहे. त्यावर अंमलबजावणी अद्यापि होत नसल्यामुळे राज्यातील विविध कंपन्यांनी शासनाच्या माध्यमातून स्वखर्चाने सन 1894 च्या भुसंपादन अधिनियमानुसार जमिनी संपादीत करून त्यावर सन 1970 अथवा त्यापूर्वीपासून उद्योग सुरू केलेले आहेत. आज सदर उद्योग विविध कारणाने बंद पडलेले असून प्रदूषणामुळे अनेक उद्योग शहराबाहेर स्थलांतरित झाले आहेत. अनेक कंपन्यांची वित्तीय संस्थांची कर्जे, कामगारांची देणी, जमिनीची विक्री, गहाण, भाडेपट्टा किंवा दानपत्र हस्तांतरण याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आमदार श्री भारत भालके यांच्या सदर विषयाबाबतच्या तारांकित प्रश्नाला राज्याचे महसूल मंत्री मा.श्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तर दिले असून त्यामध्ये सदरील विषयाबाबत राज्याचे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली शासन निर्णय दि.26.12.2016 अन्वये दि.11.01.2017 रोजी समिती गठित करण्यात आलेली होती व सदर समितीने शासनास सादर केलेल्या शिङ्गारशी अहवालाचा सर्वंकष विचार करून शासन निर्णय नुसार धोरण निश्चित करण्यात आल्याचे लेखी उत्तरात नमुद केलेले असल्यामुळे संबंधित विषयाबाबत राज्य शासन तातडीने कोणती भुमिका घेणार याकडे राज्यातील सर्व कामगार, मध्यमवर्गीय कुटूंबे यांचे लक्ष लागले आहे.
कामगार, मध्यमवर्गीय कुटूंबे यांच्या घराबाबतच्या मागण्यांना आमदार श्री भारत भालके यांनी सदर तारांकित प्रश्नाद्वारे न्याय देण्याची भुमिका घेतली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments