चैत्री वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व विठ्ठलभक्तांचे हार्दिक स्वागत!लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 26 मार्च 2018
श्रीरामनवमीनिमित्त पंढरीत श्रीरामभक्तांनी भव्य स्वरुपात शोभायात्रा काढून जय श्रीराम च्या जयघोषाने आसमंत निनादून सोडला. येथील खात चौकातील श्रीराम मंदिरापासून निघालेल्या या शोभायात्रेत रथातून श्रीरामाची भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मुक्तहस्ते अष्टगंधाची उधळण करण्यात आली.
खातचौकातील श्रीराम मंदिरापासून कालिकादेवी चौक, काळा मारुती चौक, चौफाळा, नाथ चौक ते संपुर्ण प्रदक्षिणा मार्गावरुन ही शोभायात्रा श्रीरामाच्या जयघोषात परत श्रीराम मंदिर येथे आली. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याबद्दल बोलताना श्रीरामभक्त बाळासाहेब गोडबोले पंढरपूर लाईव्हशी बोलताना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून ची ही परंपरा आहे. सर्व संघटनांचे कार्यकर्ते या शोभायात्रेत जल्लोषपुर्ण अविर्भावात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. सर्व श्रीराम भक्तांच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन केले जाते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments