1 जुन ते 10 जुन दरम्यान शेतकर्‍यांचा देशव्यापी संप..! राष्ठ्रीय किसान महासंघ कोअर कमिटी सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील यांचेकडून संपासाठी कुशल रणनिती!

पंढरपूर LIVE 25 मे 2018


1 जुन ते 10 जुन दरम्यान राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने देशव्यापी शेतकरी संप होणार असून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच एवढे मोठे शेतकर्‍यांचे आंदोलन उभा राहत असल्याची माहिती  कृती समितीच्या सदस्यांनी दिली. हा संप यशश्‍वी होण्यासाठी राष्ठ्रीय किसान महासंघ कोअर कमिटी सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील यांनी कुशल रणनिती आखली असून 800 स्वयंसेवकांची फळी तयार केली आहे. देशभरात 6 वॉर रुम अ‍ॅक्टिव्ह केल्या आहेत. या वॉररुममधून देशभरातील शेतकरी संपातील विविध हालचालीवर नजर ठेवणे व या आंदोलनासंदर्भात शेतकर्‍यांना संपुर्ण माहिती देऊन हे आंदोलन अहिंसक मार्गाने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या संपामध्ये देशभरातील अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. 

पंढरपूर येथील पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या आंदोलनाबाबतची अधिक माहिती आज देण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय किसान महासंघाचे वरिष्ठ सल्लागार व  कृती समिती महाराष्ट्र राज्य सदस्य श्रीकांत तराळ (अमरावती), राष्ट्रीय किसान महासंघ कोअर कमिटी सदस्य संदीपआबा गिड्डे पाटील, लातुरचे लक्ष्मण वंगे, नाशिक चे शंकरराव दरेकर, दिलीप चव्हाण, पंढरपूरचे किरण घाडगे आदी उपस्थित होते. 










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments