पंढरपूर LIVE 24 मे 2018
मुंबई, दि. 24 : राज्यातील विविध 6 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 12 नगरपरिषदा व नगरपंचायतीतील 13 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 30 मे 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या 21 मे 2018 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 30 मे 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर 4 जून 2018 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 7 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी 11 जून 2018 रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 13 जून 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. यात राजापूर (जि. रत्नागिरी) नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीचा आणि शेगाव (जि. बुलडाणा) नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रासाठीच्या निवडणुकीचाही समावेश आहे.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका,मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायती: भोर (जि. पुणे), वडगाव (जि. पुणे), मुक्ताईनगर (जि. जळगाव), बार्शीटाकळी (जि. अकोला), वानाडोंगरी (जि. नागपूर), पारशिवनी (जि. नागपूर) आणि शेगाव (जि. बुलडाणा) हद्दवाढ क्षेत्रासाठी.
पोटनिवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या रिक्त पदांचा नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय तपशील: राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, जव्हार (जि. पालघर)- 6 ब, पोलादपूर (जि. रायगड)- 16, पंढरपूर (जि. सोलापूर)- 10 ब, वाई (जि. सातारा)- 5 अ, मेढा (जि. सातारा)- 15, निफाड (जि. नाशिक)- 6, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- 12 अ, श्रीगोंदा (जि. अहमदनगर)- 2 ब आणि 3 क, नंदुरबार (जि. नंदुरबार)- 16 अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- 2 आणि मोहाडी (जि. भंडारा)- 12.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments