भीमा नदीला पाणी सोडण्यास अडथळा ठरणार्‍या पाटबंधारेच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या जाहीर प्रकटीकरणाविरुध्द कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली भीमा काठच्या शेतकर्‍यांचे सोलापूरात आंदोलन!

पंढरपूर LIVE 7 मे 2018


पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनात भीमा नदी ला पाणी सोडण्याचा उल्लेख नसल्याने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली भीमा नदी काठच्या गावातील शेतकर्‍यासमवेत मा. अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

भीमा नदी हे उजनी धरणाचे मुख्य जलस्त्रोत असूनही या भीमा नदीतच लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या चुकीच्या निर्णयामुळे पाणी सोडले जाणार नसल्याने भीमा नदी कोरडी पडणार आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांचे  खुप मोठे नुकसान होणार आहे. भुवैकुंठ पंढरपूर नगरीमध्ये चंद्रभागेच्या स्नानाला अत्यंत महत्व आहे. येथे येणार्‍या भाविकांना बारमाही चंद्रभागेच्या पात्रात वाहते पाणी असणे आवश्यक आहे. लवकरच अधिक महिना  येत असून या पवित्र समजल्या जाणार्‍या महिन्यात अनेक भाविक पंढरीत चंद्रभागेचे स्नान व विठोबाच्या दर्शनासाठी येत असतात. अधिक महिन्यात व इतर काात पंढरीत येणार्‍या भाविकांना जर चंद्रभागेचे पात्र कोरडे आढळले तर इथे येणार्‍या भाविकांची व भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी बांधवांची मोठी कुचंबना होणार आहे. त्यामुळे संबंधीथ चुकीचा निर्णय दुरुस्त करुन भीमा नदीला बारमाही वाहती ठेवण्यासंदर्भात निर्णय व अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.  

 याप्रसंगी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नारायण दादा मोरे, महादेव देठे, उत्तम नाईकनवरे, मोहनराव अनपट, बिभीषण पवार, विजय भिंगारे, बाळासाहेब कौलगे यांचेसह भीमा नदी काठच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments