पंढरपूर LIVE 15 मे 2018
राजकीय आणि आर्थिक स्वार्थापोटी माझ्यावर खोटे आरोप- बालाजी प्रक्षाळे
पंढरपूर (प्रतिनिधी)- दि. 2 मे 2018 रोजी युवा भीमसेनेचे विलास अर्जुन माने यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे व राजकीय वरदहस्त असलेचे आरोप करुन युवा भीमसेनेचे रमाई आवास योजनेच्या कामावर नाराजी व्यक्त केली. दि. 10 मे 2018 रोजी नगरपरिषदेसमोर त्यांनी लाक्षणिक उपोषणही केले. त्यांनी माझ्यावर राजकीय आणि आर्थिक स्वार्थापोटी खोटे आरोप करत नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले. हे चुकीचे असून माझ्यावर त्यांनी केलेल्या आरोपांचे मी खंडण करतो. अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे रमाई आवास योजना पंढरपूर नगरपरिषद चे अभिकर्ता बालाजी सोपान प्रक्षाळे यांनी दिली आहे.
याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, उपोषणकर्ते विलास अर्जुन माने यांनी स्वत: रमाई आवास घरकुल योजनेमध्ये लाभ मिळविण्यासाठी दि. 16 एप्रिल 2018 रोजी आवक क्र. 3061 ने प्रस्ताव दाखल केलेला होता. परंतु दि. 15 मार्च 2018 रोजी झालेल्या रमाई आवास घरकुल योजनेच्या मिटींगमध्ये 261 प्रस्ताव मंजुर झालेले असताना त्या 261 प्रस्तावामधून दुसर्या कोणाचा तरी एक प्रस्ताव कमी करुन त्या 261 मध्येच माझा प्रस्ताव मंजुर कर! असे मला सांगितले. परंतु रमाई आवास योजनेच्या मिटींमध्ये जे प्रस्ताव मंजुर होतात त्याच प्रस्तावांना अनुदान प्राप्त होते. असे त्यांना सांगितले असता त्यांनी मला ‘‘मी तुझ्याविरोधात उपोषण करीन व तुला कामावरुन कमी करुन टाकीन, सी.ओ. व प्रशासनाला वेठीस धरीन अशी तोंडी धमकी दिली. दि. 2 मे 2018 रोजी माने यांनी मला एक पत्र देऊन माझ्यावर चुकीचे आरोप केले. महाराष्ट्रात ‘ब’ वर्ग नगरपालिकांमध्ये पंढरपूर नगरपरिषदेने आ.प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, मुख्याधिकारी, नगरअभियंता तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सहकार्याने या रमाई आवास योजनेचे 916 प्रस्ताव मंजुर करुन महाराष्ट्र राज्यात पंढरपूर नगरपरिषद अव्वल ठरली आहे. युवा भीमसेनेने दि. 2 मे 2018 रोजी नगरपरिषदेस आंदोलन करण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानुसार दि. 9 मे 2018 रोजी नगरपालिकेने त्यांच्या पत्रास समाधानकारक उत्तर दिले. असे असताना सुध्दा माने यांनी दि. 10 मे 2018 रोजी पंढरपूर नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करुन चुकीचे व वैयक्तिक आरोप केले. याचे मी खंडण करतो.
दि.20 डिसेंबर 2017 व दि.14 मार्च 2018 या दोन्ही वेळी सर्व मिळून 284 प्रस्ताव शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. व सदरचे प्रस्ताव दि. 15 मार्च 2018 च्या मिटींगमध्ये 284 प्रस्तावापैकी 261 प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. परंतु पंढरपूर नगरपरिषदेकडे अनुदान वर्ग न झाल्याने लाभार्थ्यांना रक्कम देण्यास विलंब होत आहे. पंढरपूर नगरपरिषदेने सर्व कार्यवाही योग्यरित्या पार पाडली असूनसुध्दा अपुरी माहिती असल्यामुळे विलास माने यांनी स्वत:च्या वैयक्तिक प्रसिध्दीसाठी, राजकीय व आर्थिक स्वार्थापोटी माझ्यावर भ्रष्टाचाराचे, दमदाटीचे व राजकीय वरदहस्त असल्याचे खोटे आरोप केले आहेत. त्यांच्या सर्व आरोपांचे मी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे खंडण करीत आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments