पेट्रोल डीझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचा रस्ता रोको

पंढरपूर LIVE 28 मे 2018


अनिल चौधरीपुणे :-
 इंधन दरवाढीविरोधात सर्वसामान्य वाहनचालकांकडून ओरड होत असतानाच सलग 15 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महागतच आहेत. दररोज पेट्रोल डीजेल दर वाढतच आहे या दरवाढी मुळे सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे. या दरवाढीच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पुणे शहर व हडपसर मतदार संघाच्या वतीने मा.आ.महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली घोडयावर फेरी मारून विकास बधेगणेश कामठे महादेव बाबरघुले ताई या शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन करत कोंढवा भागातील खडी मशीन चौकात सरकारच्या विरोधात घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
    वाढलेल्या इंधन दरवाढी विरोधात मा.आ.महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली खडीमशीन चौकात हडपसर मतदार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना महादेव बाबर यांनी केंद्र सरकारचा भरपूर समाचार घेतला तसेच स्थानिक आमदाराच्या कारभारा विरोधात जोरदार टीका-टिप्पणी केली.
  पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवरही झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत आहेत.यावेळी बोलताना शिवसेना नेते गंगाधर बधे म्हणाले , 
मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी इंधनदराबाबत लवकरच दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकारी पातळीवर इंधनदर कमी करण्याबाबत घोषणा होत असल्या तरी अंमलबजावणी शून्य असल्याचं दिसून येत आहे.पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. परंतु दरांवर नियंत्रण आणण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेलं नाही. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे.
 यावेळी विकास बधे यांनी देखील भाजपच्या पेट्रोल डीजेल दरवाढीचा निषेध व्यक्त केला.
याप्रंगी महिला शिवसेना शहरप्रमुख नगरसेविका संगीताताई ठोसरमा.नगरसेवक भरत चौधरीविजय देशमुख,गंगाधर बधेविकास बधेमच्छिंद्र दगडेअमोल हरपळेकिरण ठोसरप्रवीण ठोसरगणेश कामठे सागर कामठेसमीर तुपेदीपक घुलेअंबादास शिंगेभरत शेंडकरमाऊली भोईटेशंकर लोणकरसचिन कापरेराम खोमणेसुनील कामठे व शिवसैनिक मोठ्या प्रामाणात उपस्थित होते.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments