पंढरपूर LIVE 19 मे 2018
संभाजी ब्रिगेडमध्ये फुट पडलीय का..? संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुकांमध्ये तिकीटांचे वाटप कसे करणार? उमेदवारांच्या निवडी कशा केल्या जाणार? निवडणुकांसाठी लागणार्या आर्थिक ताळमेळाचं काय? काय म्हणाले संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर? बघा स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट फक्त पंढरपूर लाईव्ह वर!
संभाजी ब्रिगेड चे प्रदेश महासचिव सौरभ दादा खेडेकर हे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौर्यावर आले आहेत. आज पंढरपूरमधील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून या दौर्यासंदर्भात माहिती दिली. संभाजी ब्रिगेडच्या राजकीय वाटचालीसंदर्भात, आगामी निवडणुकांमधील संभाजी ब्रिगेडच्या रणनितीसंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या पुढील ध्येय धोरणांसंदर्भात व मराठा आरक्षणासंदर्भात तसेच संभाजी ब्रिगेडच्या दोन वेगवेगळ्या संघटनांमध्ये रुपांतर होऊन कार्यकर्त्यांमध्ये फुट पडल्याच्या चर्चेसंदर्भात ‘पंढरपूर लाईव्ह’शी बोलताना अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
यावेळी किरणराज घाडगे (पुणे विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड) सचिन जगताप जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, बाळासाहेब बागल तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, प्रशांत शिंदे नगरसेवक, सतिश आप्पा शिंदे, जिवन काका पाटील, दत्ता ताड, स्वप्निल गायकवाड, दादा बोडके, अनिकेत मेटकरी, बंटी वाघ, बालाजी आटकळे, आकाश माडवे, संदिप पाटील, पिंटू आटकळे, अजिंक्य दुपडे, सचिन कोल्हे, समाधान क्षिरसागर तालुका अध्यक्ष मगंळवेढा , संदीप फडतरे शहर अध्यक्ष मगंळवेढा आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
- संभाजी ब्रिगेड ही स्वतंत्र संघटना नसून हा मराठा सेवा संघाचा एक कक्ष आहे..!
- रजिस्टे्रशन करण्याचे अधिकार दिले याचा अर्थ संभाजी ब्रिगेड त्यांच्या मालकीची होत नाही!
- 100 टक्के समाजकारण व शंभर टक्के राजकारण हे संभाजी ब्रिगेडचे ब्रीदवाक्य!
- 30 नोव्हेंबर ला संभाजी ब्रिगेडच्या राज्यव्यापी मेळावा औरंगाबाद येथे भरवणार!
- संपुर्ण महाराष्ट्रभर 50 दिवसांची ‘स्वराज्य निर्धार’ रथयात्रा काढणार!
- मराठा आरक्षणाबाबत शासनाच्या वेळकाढुपणाला विरोध होणं गरजेचं!
- निवडणुकांमध्ये पैसा आणि दारुचा वापर करणार्या बरबटलेल्या राजकारण्यांना विरोध करणार..!
- जनतेसमोर एक वेगळा खंबीर राजकीय पर्याय संभाजी ब्रिगेडच्या रुपाने ठेवणार!
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments