राष्ट्रीय गोकुळ मिशन’मध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट.... सात पुरस्कारांवर राज्याची मोहोर!

पंढरपूर LIVE 24 मे 2018


मुंबईदि. 24 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराचा पश्चिम विभागातील बहुमान महाराष्ट्र राज्याने पटकावला असून या पुरस्कारासह एकूण सात पुरस्कारावर राज्याने मोहोर उमटवली आहे.
            केंद्र शासनाकडून देशातील चार विभागांतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्रासहगुजरातमध्य प्रदेशगोवाछत्तीसगड या राज्यांचा तसेच दादरा व नगर हवेली आणि दीव- दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारराष्ट्रीय गोकुळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणीउत्कृष्ट पशुवैद्यकउत्कृष्ट कृत्रिम रेतन सेवा पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार राज्याला प्राप्त झाले आहेत.
            पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारासाठी पशुधनाची उत्पादकतापशुवैद्यकीय  सेवेचा दर्जा,रोग नियंत्रणपशुप्रजनन कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणीकृत्रिम रेतनाचे कामरोग प्रादुर्भावासंदर्भातील माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरण्यास प्रतिसादकेंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणीपशुसंवर्धन योजनांची माहिती पशुपालकांपर्यंत  पोहोचविण्याचा विस्तार कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी आदी बाबींचा विचार करण्यात आला. देशी गोवंश तसेच म्हशींच्या जातींचे जतन व संवर्धन यावर राष्ट्रीय गोकुळ  मिशनमध्ये विशेष भर देण्यात आला आहे.
          पशुधन सेवांचा विस्तार प्रत्येक पशुपालकापर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे गेल्या तीन-चार वर्षात खूपच मेहनत घेतली आहे. आपल्या देशी गोवंश आणि म्हशींच्या जातींचे महत्त्व विकसित देशांनाही समजले आहे. त्यामुळे आपल्याकडील देशी जातींचे जतन व संवर्धन करण्यासाठी विभाग अविरत कार्य करीत आहे. त्याचा आजच्या पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मान झाल्याचा आनंद आहे
                                                                                                             महादेव जानकर,
                                                 मंत्रीपशुसवंर्धनदुग्धविकास व मत्स्यविकास

सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारसह पुढील पुरस्कार राज्याला प्राप्त झाले आहेत.
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार : प्रथम पुरस्कार- अनिरुद्ध भगिरथ पाटीलतरसालीता. बागलाणजि. नाशिक
उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार :
        प्रथम पुरस्कार- डॉ. अनिल तुळशीराम परिहारसहायक पशुसंवर्धन आयुक्ततालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालयकराड (जि. सातारा)
            द्वितीय पुरस्कार- डॉ. दिनकर भाऊराव बोर्डेसहायक पशुसंवर्धन आयुक्ततालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालयपंढरपूर (जि. सोलापूर)
उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ पुरस्कार :
            द्वितीय पुरस्कार- बाळासाहेब तुकाराम कोल्हेकृत्रिम रेतन तंत्रज्ञबायफसोनेवाडीता. कोपरगाव (जि. अहमदनगर)
            द्वितीय पुरस्कार- डॉ. अनिल विठ्ठलराव इंगोलेपशुधन विकास अधिकारीसासवड (जि. पुणे)
राष्ट्रीय गोकुळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी : प्रथम पुरस्कार










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments