डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

पंढरपूर LIVE 29 मे 2018


 पंढरपूर देवस्थानसाठी केलेल्या प्रयत्नांची शासनाकडून दखलकराडमध्ये आज जंगी स्वागत

कराडता. 29 : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉअतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहेया संदर्भातील नोटीफिकेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 28) सायंकाळी सही केली असूनयाबाबतचा शासन आदेशही नुकताच पारित झाला आहेश्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ असूनडॉअतुल भोसले यांनी अल्पावधीतच श्री विठ्ठल देवस्थानचा कायापालट करण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची दखल घेऊनशासनाने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे.
          गेल्यावर्षी आषाढी यात्रेच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉअतुल भोसले यांची महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणार्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलीत्यानंतर डॉभोसले यांनी पंढरपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार जाहीर करतमंदिराच्या विकासासाठी सातत्याने विविध महत्वाचे निर्णय घेत आपल्या कार्याची छाप राज्यभरात उमटवली.महाराष्ट्रासह कर्नाटक व आंधप्रदेशातून विठ्ठल दर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांना सुलभरित्या दर्शन मिळावे यासाठी डॉभोसले यांनी येत्या आषाढीपासून तिरूपती व शिर्डीप्रमाणे टोकन पद्धत सुरू करण्याचे नियोजन आखले आहेसंतसाहित्याचे संशोधन व्हावे आणि त्याचा प्रसार व्हावाया उद्देशाने स्वतंत्र संत विद्यापीठ उभारण्यास डॉ.भोसले प्रयत्नशील असूनत्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉविजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज संतपीठ नावाची संस्था स्थापन करण्यासाठी 15 नामवंत तज्ज्ञांची समिती नुकतीच गठीत केली आहे
डॉअतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे मंदिर परिसराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने सहकार्य करण्यास मान्यता दिली असूनयाबाबत दोन्ही देशांच्या स्तरावर चर्चा सुरू आहेडॉभोसले यांनी मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊनया कामासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमला आहेत्यांच्या या निर्णयामुळे पंढरपूर आता चकाचक दिसू लागले आहेतब्बल 350 खोल्यांची क्षमता असणार्या सुसज्ज व देखण्या भक्तनिवास वास्तूचे काम डॉभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असूनलवकरच ते भाविकांसाठी खुले केले जाणार आहेभाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पंढरपूर शहरात 5 ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्याचेही नियोजन सुरू आहेश्री क्षेत्र पंढरपूरचे पर्यटनदृष्ट्या महत्व वाढविण्याच्या दृष्टीने ‘श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान’ या नावाचे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहेमहिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात चेजिंग रूम उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयही डॉअतुल भोसले यांनी घेतलातसेच श्रींच्या चरणी अर्पण झालेले वेगवेगळ्या स्वरूपातील 24 किलो सोने आणि 800 किलो चांदी वितळवून त्यांच्या विठ्ठल चरणातील विटांच्या स्वरूपात वस्तू तयार करण्याचा महत्वाचा निर्णय डॉभोसले यांनी घेतला.याशिवाय भाविकांना लाडू प्रसादमंदिर समितीच्या कर्मचार्यांना गणवेश असे अनेक महत्वाचे निर्णय घेऊन डॉअतुल भोसले यांनी अवघ्या 10 महिन्यांच्या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिसराचा कायापालट केला आहे.
डॉअतुल भोसले यांच्या या कार्याची दखल घेत आणि त्यांना मंदिराचा अधिकाधिक विकास करता यावा या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहेया पदामुळे डॉभोसले यांना शासकीय व राजकीय बळ प्राप्त झाले असूनत्याचा फायदा पंढरपूर देवस्थानसह कराड दक्षिण मतदारसंघातील गावांनाही होणार आहे.


आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी असूनया पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाचा सन्मान केला आहेपंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी येणार्या लाखो भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा माझा प्रयत्न असूनवारकरी केंद्रबिंदू मानूनच मी यापुढेही कार्यरत राहणार आहे.
नामदार डॉअतुल भोसले


कराडमध्ये आज जंगी स्वागत

राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर नामदार डॉअतुल भोसले यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टीच्या कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केले आहे.बुधवारी (ता. 30) दुपारी 3.30 वाजता तासवडे टोल नाका येते डॉभोसले यांचे आगमन होणार असूनतेथून मिरवणुकीने वहागाव फाटाखोडशीवारूंजी फाटा मार्गे कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर ते महात्मा गांधींच्या पुतळ्यास हार घालतीलत्यानंतर कराड शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली फिरून कराडकर मठात दर्शन व पुढे यशवंतराव चव्हाण यांनी समाधीस्थळावर अभिवादन व महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येईलत्यानंतर कृष्णा हॉस्पिटलच्या कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्वजयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन करूनही रॅली मलकापूरकाले फाटाआटके टप्पावाठाररेठरे खुर्द मार्गे रेठरे बुद्रुक येथे पोहचेलतेथे गपवार व्यासपीठावर सायंकाळी 7.30 वाजता ज्येष्ठ मार्गदर्शक मदनराव मोहितेकृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉसुरेश भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments