पंढरपूर LIVE 30 मे 2018
पंढरपूरः- ‘येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक) मध्ये प्रथम वर्षं व थेट द्वितीय (डिप्लोमा) वर्षांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या १० वी, १२ वी,आय.टी.आय. व एम.सी.व्ही.सी.उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत इंग्लिश स्पिकींग कोर्स’ तसेच ‘गणित आणि कॉम्प्युटर फंडामेंटल’ या विषयांचे सराव वर्गांच्या माद्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून त्याचा कालावधी शुक्रवार,०१ जून २०१८ ते शनिवार ३० जून २०१८ आहे व त्याची वेळ सकाळी १० ते सायं.४ वाजेपर्यंत आहे.’ अशी माहीती डिप्लोमा पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली.
पदवी इंजिनिअरींगला मिळालेल्या अफाट यशामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणखीच वाढल्या. त्यामुळेच कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक) या महाविद्यालयाची स्थापना २००८ मध्ये करण्यात आली. शिस्त, आदर व संस्कार या बरोबरच उत्कृष्ठ निकालाची परंपरा अबाधित राखल्यामुळे अल्पावधीतच हे पदविका महाविद्यालय राज्यात नावारूपास आले. या सराव वर्गामध्ये तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि भरपूर सराव यावर अधिक भर देण्यात येणार असून बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व शहरातील विद्यार्थ्यांसाठी बसेसची सोय करण्यात आली आहे. यासंबंधी अधिक माहीतीकरीता व प्रवेशाकरिता कार्यालय (मोबा. क्र.-७७६७००३३७२), डॉ.डी.एस.चौधरी (९८६०१६०४३१), प्रा.एस.एस.गायकवाड (९८९०५६६२८१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments