पंढरपूर LIVE 21 मे 2018
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांनी प्रकटनात उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्याचे वगळल्याने सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणल्याने भीमानदी पाणी संघर्ष समितीच्या वतीने नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मौजे खरसोळी येथे आयोजित केलेल्या गावभेटी प्रसंगी शेतकरी बांधवांशी सुसंवाद साधताना भीमानदी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष कल्याणराव काळे
उजनी धरणाची निर्मिती झालेपासून भीमा नदीचे पाणी शेतकऱ्यांना मिळणेबाबत उन्हाळी व रब्बी हंगामात जाहीर प्रकटन निघून शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. उजनी धरणाच्या पाणी वाटप धोरणामध्ये वारंवार बदल करून हे पाणी राज्याच्या विविध भागात नेण्यात आले. त्यामुळे आपल्या हक्काचे पाणी कमी होत गेले.त्याचाच कहर म्हणून उन्हाळी हंगाम २०१७-२०१८ साठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने काढलेल्या प्रकटीकरणातून भीमानदी वगळण्यात आलेली आहे. म्हणजेच आपणास हक्काचे पाणी देण्यास कायदेशीर नकार दिलेला आहे.
नदीकाठच्या शेतकऱ्याचे संसार वाचविण्यासाठी व नवीन पिढी सक्षम बनविण्यासाठी आपणास आपले हक्काचे पाण्यासाठी सर्व पक्षीय लढा उभा करावा लागणार आहे त्यासाठी आम्ही आपल्या गावी आमची भूमिका मांडत आहोत असेही काळे यांनी सांगितले.*
यावेळी सुधाकर कवडे, दिनकर चव्हाण , महादेव देठे, शैलाताई गोडसे, यांची समयोचित भाषणे झाली.
याप्रसंगी राजेंद्र शिंदे, विष्णू यलमर,बिभीषण वाघ, राजाराम पाटील, प्रदीप निर्मळ, तानाजी सरदार, नागेश फाटे, मारुती भोसले, तुकाराम माने, मोहन नागटिळक, सादिक मुलाणी, लक्ष्मण मदने, संदीपान मदने, बिरू देवकते, दिनकर डोंगरे,गोपीनाथ गायकवाड, विजयकुमार गायकवाड, रेवणसिद्ध पुजारी, रमाकांत नाना पाटील, संजय वाघ,मारुती वाघ, भीमराव पवार, रणजित जगताप, विठ्ठल माने, समाधान शिंदे, महादेव माने, विजय उंबरकर, आनंद निर्मळ विटे, पोहरगाव, तारापूर, शंकरगांव, नळी आंबेचिंचोली, पुळूज
येथील शेतकरी, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments