पंढरीत कॉग्रेस(आय)च्या वतीने राजीव गांधी यांचा स्मृती दिनानिमित्त श्रध्दांजली अर्पण

पंढरपूर LIVE 21 मे 2018


पंढरपूर शहर व तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान राजीवजी गांधी स्मृतीदिन साजरा करण्यात आला.यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन धुळे येथील जेष्ठ विधिज्ञ ऍड.गोविंदराव कासार यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बजरंग बागल हे होते.
        यावेळी पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भाद्ुले.अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अशपाक सय्यद,प्रतापसिंह रजपूत,द.बडवे,प्रा.सुदर्शन मसुरे,प्रकाश मोरे आदींनी स्व.राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला व या देशाचे युवा पंतप्रधान म्हणून त्यांनी राबविलेल्या योजना व घेतलेले कॉम्पुटर क्रांतीसारखे धाडसी निर्णय घेतल्याने या देशाची वाटचाल महासत्तेच्या दिशेने सुरु झाली.देशाला 21 व्या शतकाकडे घेवून जाण्याचे स्वप्न स्व.राजीव गांधी यांनी पाहीले होते.
    या कार्यक्रमास मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,मामा फलटणकर,देवानंद इरकल,मिलिंद आढवळकर,दिपक येळे,राजेंद्र मोरे,सुभाष हुंगे-पाटील,प्रा.अशोक डोळ,नागनाथ अधटराव,अभिषेक शहा,मा.अध्यक्ष नागेश गंगेकर,संदीप पाटील,युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष अमित डोंबे,भाउसाहेब तेलंग,संजय घोडके,संदीप माने,अदित्य फत्तेपूरकर,राजू उराडे,शेखर मंगेडकर,शाम गोगाव,सुरज कुकडे आदी उपस्थित होते.यावेळी भाई राजेंद्र भोसले यांनी प्रथम वंदन प्राथर्ना करून कार्यक्रमाची सुरुवात केली तर शेवटी आभार मारुती भोसले यंानी मानले. 









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments