रामनगरच्या तलावात बहीण-भावाचा बूडून मृत्यू :सर्वञ शोककळा

पंढरपूर LIVE 21 मे 2018


निलेश चाळक बीड- : तालुक्यातील रामनगर शिवारातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे सर्वञ शोककळा पसरली आहे सुरज राजेश पवार (१५) व रंजना राजेश पवार (८) रा. सात्रापोत्रा ता.बीड अशी मृत बहिण - भावाची नावे आहेत. रामनगर शिवारात या दोघांचे आई-वडील विहीरीवर कामास येत होते. त्यांच्याबरोबरच शनिवारी सुरज व रंजना आले असता नेहमीसारखे ते पोहण्यासाठी लगतच्या पाझर तलावाकडे गेले. सुरज याला पोहता येत असून तो आपल्या बहीणीलाही पोहायला शिकवत होता. मात्र, तलावाच्या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने रंजना ही बूडू लागली होती. तिने आरडाओरड करताच सुरज तिला वाचविण्यासाठी गेला असता तिने त्याला घट्ट मिटी मारली व यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे तलावातून बाहेर काढताना हे दोघे मिटी मारल्याच्या अवस्थेतच होते. हाकेच्या अंतरावर असलेल्या आई-वडीलांना हा प्रकार माहितीच झाला नाही. मात्र बराच वेळ होऊनही हे दोघे परत आले नसल्याने त्यांनी तलावाकडे धाव घेतली व ही दुर्घटना झाल्याचे दिसून आहे. त्यानंतर बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार  बल्लाळ व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. 
आई-वडीलांचा आक्रोशराजेश पवार यांना सुरज आणि रंजना ही दोनच मुले होती. मात्र, शनिवारच्या या दुर्घटनेत त्यांनी दोघांनाही एकाच वेळी गमावल्याने त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. दोघांचेही मृतदेह एकाच वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणले होते. हे दोघेही घटनास्थळीच मृत होऊनदेखील अणखीन एकदा तपासणी करण्याची विनवणी हे माता-पिता करीत होते. १५ वर्षाचा सुरज हा त्यांना विहीर खोदण्याच्या कामातही मदत करीत होता. 









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments