डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज एम. डी (पॅथॉलॉजी) प्रवेश क्षमतेत वाढ

पंढरपूर LIVE 19 मे 2018


मुंबईदि. 19अमरावतीच्या डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल  कॉलेज येथे एम. डी (पॅथालॉजी)  या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत 2 वरून 7 एवढी वाढ करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे.
            केंद्र शासनाने दिलेली मान्यता विचारात घेऊन राज्यशासनाने डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल  कॉलेज या संस्थेस सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.  यात प्रवेशाकरिता निश्चित केलेली कार्यपद्धती वापरणेशैक्षणिक शुल्क आकारणीसाठीची कार्यपद्धती अनुसरणेमहाराष्ट्र एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स (प्रोव्हिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) ऍक्ट1987 मधिल तरतुदींचे पालन करणे आदिंचा समावेश आहे. या संस्थेस कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली असून गुणवत्तेवर आधारित प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्याप्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मंजूर करून घेणे आवश्यक राहणार आहे.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments