श्री विठ्ठल अभियांत्रिकीत प्रथम वर्ष इंजिनिअरींग प्रवेशाबाबत मोफत मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

पंढरपूर LIVE 28 मे 2018

पंढरपूरः- थोड्याच दिवसात अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रीया सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आज मोफत मार्गदर्शन केंद्राच्या स्वतंत्र कार्यालयाचे उदघाटन  कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन गोसावी व ज्ञानप्रसाद आणि ब्रिलीयंट अॅकॅडमीचे संचालक प्रा. मंदार परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. 

       गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये डिग्री इंजिनिअरींगच्या प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत व मिळालेल्या गुणानुसार मिळू शकणारी अभियांत्रिकीची शाखा आणि योग्य  महाविद्यालय याबाबतचे मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले असून याचा लाभ अभियांत्रिकीला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना घेता येणार आहे. मागील दोन वर्षापासून शासनाच्या इंजिनिअरींग कॅप राऊंड मधील बदललेल्या नियमांमुळे यंदा देखील विद्यार्थी व पालकांचा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी विद्यार्थी व पालकांचा होणारा लक्षात घेवून डिग्री इंजिनिअरींगचा प्रवेश अर्ज कसा भरावा?, इंजिनिअरिंग मधील विविध शाखांची निवड कशी करायची?, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंडस) , चॉईस कोड याबाबत विद्यार्थी व पालकांना अभियांत्रिकी महाविद्यालयातच मोफत मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांची समिती नेमली असून, मार्गदर्शन केंद्रात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला व पालकांना  योग्य मार्गदर्शन केले जात आहे. याचा इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रा.यु.एल. अनुसे (९१६८६५५३६५) व प्रा. पी.के भुसे (९२८४०७७०८० ) तसेच टोल फ्री क्रमांक  १८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधावे.

छायाचित्रः- श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मोफत मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयाचे उदघाटन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन गोसावी व ज्ञानप्रसाद आणि ब्रिलीयंट अॅकॅडमीचे संचालक प्रा. मंदार परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सोबत प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे व इतर प्राध्यापक वर्ग.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments