पंढरपूर LIVE 28 Jun 2018
नवी दिल्ली – २०११ मधील जनगणनेच्या आधारे देशात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषेत मराठीने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांत बोलल्या जाणा-या तेलुगू भाषेला मागे टाकले असून या यादीत मराठी भाषा आता तिस-या स्थानी पोहोचली आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१.०३ टक्क्यांवरून ४३.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर बंगाली भाषा ही दुस-या स्थानी आहे.
देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी जनगणनेच्या आधारे तयार करण्यात आली आहे. मराठी भाषा बोलणा-यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये वाढले आहे. २००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्क्यांवर पोहोचले. मराठीने याबाबतीत तेलुगूला मागे टाकले आहे. तेलुगू मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण घटले आहे. तेलुगू भाषा बोलणा-यांचे प्रमाण ७.१९ टक्क्यांवरून ६.९३ टक्क्यांवर घसरले आहे.
हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत वाढले आहे. २००१ मध्ये हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१.०३ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ४३.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. बंगाली भाषा दुस-या स्थानी आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ८.१ टक्क्यांवरून ८.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. मातृभाषेच्या यादीत उर्दू सातव्या स्थानी असून २००१ मध्ये उर्दू भाषा सहाव्या स्थानी होती. आता गुजराती भाषा सहाव्या स्थानी आहे.
देशातील २.६ लाख लोकांनी इंग्रजी ही मातृभाषा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणा-यांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील १.०६ लाख लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे, तर इंग्रजी मातृभाषा असलेल्यांच्या यादीत तामिळनाडू दुस-या स्थानी आहे. राष्ट्रीय भाषा सूचितील २२ भाषांपैकी संस्कृत ही सर्वात कमी बोलली जाणारी भाषा ठरली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments