पंढरपूर LIVE 10 July 2018
पंढरपूर- प्रत्येक भारतीयांना शांत झोप लागावी, निश्चिंत राहावे यासाठी भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून अहोरात्र भारतीय सैनिक पहारा देत असतात. त्याच लढवैय्या सैनिकांचे मनोधर्य वाढावे या हेतूने भारतभर ‘७ डिसेंबर’ रोजी ‘सशस्त्र झेंडा दिवस’ साजरा केला जातो. त्याचीच जनजागृत स्वेरीचे माजी विद्यार्थी लेप्टनंट कमांडर मनोज गुप्ता हे करत असून सायकलवर काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करत असून सर्वत्र या स्तुत्य उपक्रमाचे जोरदार स्वागत होत आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)
भारतीय सैनिकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या शत्रू विरोधी सुरु असलेली कार्यात उर्जा यावी म्हणून त्यांच्या सन्मानार्थ ‘सशस्त्र झेंडा’ खरेदी करून आपल्या छातीवर लावणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सीमेवरील जवानांना उर्जा मिळते. त्याचबरोबर झेंडे खरेदी केल्यानंतर जमा झालेली रक्कम ‘सैनिक कल्याण निधी’ मध्ये सैनिकांच्याच कल्याणासाठी जमा होत असते. याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देखील व्हावी या हेतूने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलितकॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मनोज गुप्ता याचे कश्मिर ते कन्याकुमारी या दरम्यान असणाऱ्या राज्यात व त्यातील प्रमुख शहरांमध्ये सैनिकांबद्दल जनजागृती करण्याचे कार्य हाती घेतले असून ते आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेवून सैनिकांबद्दल जनजागृती करून अधिक माहिती दिली. सायकलवर भ्रमती सुरु असून कमांडर गुप्ता यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून सैनिकांना मदत व्हावी. या हेतूने गुप्ता यांचा प्रवास सुरु झाला आहे. ६ जून रोजी सायकल वर प्रवास सुरु झाला येत्या १६ जुलै रोजी कन्याकुमारीमध्ये सायकलीवर प्रवास पूर्ण होणार आहे. दरम्यान जवळपास तीन हजार पाचशे किलोमीटरपर्यंतचा प्रवास असून ते दररोज ७० ते १३० किलोमीटर सायकलवर प्रवास करतात. यावेळी त्यांचे प्रत्त्येक शहरात औक्षण करून स्वागत करत आहेत. गुप्ता हे मुळचे मुंबईचे असून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये सन २०१० रोजी उत्तीर्ण होवून कॅम्पस प्लेसमेंटद्वारे ‘इंडीयन नेव्ही’मध्ये त्यांची निवड झाली असून नेव्ही मार्फतच हा दौरा सुरु असून त्यांची भारतभर जनजागृती करण्याचे कार्य सुरु आहे. स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीच्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कौतुक केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments