छायाचित्रांच्या माध्यमातून वारकऱ्यांना घडविणार 'आकाशवारी' ... आदेश बांदेकर यांचा संकल्प..कार्तिकिवारीमध्ये 'पाहावा विठ्ठल' छायाचित्रांचे प्रदर्शन...

पंढरपूर LIVE 8 July 2018


पंढरपूर,  (प्रतिनिधी) पंढरीची पायी वारी अनेकांनी अनुभवली आहे पण पंढरीची आकाशवारी फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुभवली आहे. त्यांनी अनुभवलेली आकाशवारी ही प्रत्येक वारकऱ्याला अनुभवता याची यासाठी उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या कार्तिकीवारीला पंढरपूरमध्ये भरविणार असल्याची माहिती 
होममिनिस्टरचे लाडके भावजी आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी पत्रकारांना दिली. 

पंढरपूरच्या पायीवारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारीचा हा अद्वैत सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी  महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील आबालवृद्ध सहभागी होत असतात. पंढरीच्या या वारीचे आकर्षण प्रत्येकालाच आहे तसे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील होते. मात्र त्यांनी पायी वारी अनुभवण्यापेक्षा पायी चालणारा हा सोहळा आकाशातून कसा अनुभवता येईल यादृष्टीकोनातून ऐतिहासिक असे काम केले आहे.

वारीची ओढ, वारकऱ्यांविषयी असलेली आत्मीयता आणि संतांच्या चरणी नथमस्तक होण्याच्या दृष्टीकोणातून उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरच्या साह्याने आकाशवारी पूर्ण करण्याचा निश्चय केला.  मोठ्या धाडसाने आणि कौशल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून वारीचा अनुपम हा सगळा अनुपम अन नेत्रदीपक असा सोहळा टिपला. अगदी देहू-आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंतचा हा सगळा प्रवास आहे.  पालखीच्या या मार्गावरील प्रत्येक घटना ठाकरे यांनी खूप कष्ट आणि धोका पत्करून टिपल्या आहेत.

आकाशातून दिसणारी पालखी सोहळ्याची विहिंगम दृश्य उद्धव ठाकरे यांनी आपल्या 'पाहावा विठ्ठल' या छायाचित्र पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणली आहेत. छायाचित्रांच्या या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्याची छायाचित्रे काढली होती. त्याचे प्रदर्शन राज्यभर भरविण्यात आले. तसाच प्रयोग 'पाहावा विठ्ठल' या पुस्तकाच्या बाबतीत आहे. या पुस्तकातील काही निवडक छायाचित्रे वारकऱ्यांना सहजतेने पाहता यावीत त्याचा आनंद घेता यावा विठुरायाची वारी आकाशातून कशी दिसते हे वारकऱ्यांना अनुभवता यावे  या उद्देशाने येत्या कार्तिकीवारीमध्ये पंढरपूर मध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. यामुळे वारकऱ्यांना पायी वारी तर घडते आहेच या शिवाय आकाशवारी घडावी हा या मागचा उद्देश असल्याचे बांदेकर यांनी स्पष्ट केले.




  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments