खुश खबर.. उजनी धरण आज 100 टक्के भरले!

पंढरपूर LIVE 27 आॅगस्ट  2018


सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसाच्या कृपेवर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणारे उजनी धरणाने  सोमवारी दुपारी बारा वाजता १०० टक्कयांचा टप्पा पार केला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़  सोमवारी दुपारी बारा वाजता दौंडचा विसर्ग ३९ हजार ९८१ झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीपासून यंदा १६ वेळा धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरले. गेल्या ३७ वर्षांत अनेकदा ऐन पावसाळ्यात पाणीपातळीने मृतसाठा गाठला, तर अतिवृष्टीमुळे आतापर्यंत आठवेळा उजनी ओव्हरफ्लो झाल्याची उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडे नोंद आहे. 
उजनीची स्थिती़...
पाणी पातळी = ४९६़८३०
एकूण साठा = ३३२०़०३
उपयुक्त साठा = १५१७़२२
टक्केवारी = १०० टक्के
दौड विसर्ग = ३० हजार ९८१ क्युसेस
बंडगार्डन विसर्ग = ३१ हजार ७७० क्युसेस
बोगदा = १०५० क्युसेस
कालवा = २३०० क्युसेस
नदी = ५००० क्युसेस
सिना = माढा = ३५० क्युसेस
उजनीवर जिल्ह्याचे अर्थकारण
सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आणि त्याबरोबरच साखर कारखान्याच्या उभारणीला वेग आला. केवळ उजनी धरणातील पाण्यावर जिल्ह्याचे अर्थकारण विसंबून राहिले. सध्या जिल्ह्यात ३३ साखर कारखाने उसाचे गाळप करीत असून येत्या हंगामात ही संख्या वाढणार आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments