केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला पंढरीचा विठूराया! श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडून 25लाखांची मदत जाहीर; अध्यक्ष नामदार डॉ.अतुल भोसले यांची घोषणा

पंढरपूर LIVE 24 आॅगस्ट  2018


पंढरपूरता. 23 : केरळ येथे आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असूनलाखो लोक विस्थापित झाले आहेतया पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी साक्षात पंढरपूरचा विठुराया सरसावला आहेकेरळ पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडून 25 लाख रूपयांचा मदतनिधी देणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष नामदार डॉ.अतुल भोसले यांनी केली.

निसगसंपन्नतेने नटलेल्या केरळला तीव्र पुराचा फटका बसल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहेया पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली असूनसुमारे 46 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहेतसेच 10 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेतशिवाय 1700 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहेकेरळ राज्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी या राज्यातील पूरग्रस्त बांधवांना देशराभरातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू असूनमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारच्या माध्यमातून केरळसाठी भरीव निधी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केरळ पूरग्रस्तांसाठी 25 लाख रूपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहेयेत्या 2 दिवसांत त्याबाबतच्या वैधानिक गोष्टींची पूर्तता करून हा निधी केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सूपुर्द करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नामदार डॉअतुल भोसले यांनी दिली.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments