पंढरपूर LIVE 26 आॅगस्ट 2018
पंढरपूर न.प.संचलित लोकमान्य विद्यालयात पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समितीचे सभापती मा.श्री विवेकजी परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष कोळी होते.शिक्षिका सौ जमदाडे यांनी सर्वांचे स्वागत केले.सभेची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतीमेच्या पुजनाने झाली.
पालक सभेच्या सुरूवातीस प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सदानंद डिंगरे सर यांनी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यासाठी पालकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. दर आठवड्याला कमीत कमी एकदा पालकांनी आपल्या पाल्याच्या वर्गशिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना भेटुन आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा ध्यावा असे सांगितले. शिक्षकांच्या वतीने श्रीमती साखरे यांनी विविध शैक्षणिक आणि शिस्तविषयक उपक्रमांची माहिती दिली.
शिक्षण समिती सभापती श्री विवेक परदेशी यांनी पालकांना आपल्या पाल्याच्या प्रगती विषयी जागृत राहण्यास सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विद्यालयातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी विविध स्पर्धेत यश मिळवत आहेत. विविध व्याख्याने आणि तज्ञ मार्गदर्शकांमुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण झाली आहे असे सांगितले. अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेबद्दल व सभापती विवेक परदेशी यांच्या प्रयत्नावर , सकारात्मक दृष्टीकोना बद्दल समाधान व्यक्त केले.
श्री धनंजय मिसाळ सर यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक श्री अभय आराध्ये आणि सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री पवार सर यांनी आभार मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com








0 Comments